Joy for couple after staff at North Shields tip recover missing wedding ring 
ग्लोबल

सफाई कर्मचाऱ्यांची कमाल! १० फूट कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून शोधली तरुणाची हरवलेली लग्नाची अंगठी 

सकाळ डिजिटल टीम

व्हॅलेंटाईनदिनी लग्नाची अंगठी हरवल्याने हताश झालेल्या तरुणाच्या मदतीसाठी काही सफाई कर्मचारी पुढे सरसावले आणि त्यांनी थक्क करणारं काम करुन दाखवलं. १० फूट खोल कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवलेली छोटीशी अंगठी या सफाई कर्मचाऱ्यांनी शोधून काढली. त्यांच्या या कामगिरीनं भारावून गेलेल्या संबंधीत तरुणानं या सफाई कर्मचाऱ्यांप्रती अभिमान व्यक्त केला तसेच त्यांना बक्षिसही दिलं. इंग्लंडमधील नॉर्थ टाईनसाईड काऊन्सिल येथे ही घटना घडली.

आपली लग्नाची अंगठी बोटातून पडल्याने ती आता सापडणे शक्यच नाही असं समजून आशा गमावलेल्या जेम्स रॉस या तरुणाला हीच अंगठी चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाकाऊ कार्डबोर्ड देण्यासाठी एका रिसायकल सेंटरवर गेलेल्या जेम्सच्या बोटातून अंगठी खाली पडली. त्यानंतर ती तिथल्या कचऱ्यासोबत कचऱ्याच्या गाडीत गेली. यानंतर त्याने आपली अंगठी सापडण्याची आशाच सोडून दिली होती. यानंतर दोन दिवसांनी तो आपल्या घरी व्हॅलेंटाईन्स डे निमित्त जाणार होता. मात्र, त्याच्या बोटात अंगठी नसल्याने तो नाराज झाला होता. जेम्सनं याबाबत कचरा प्रकल्पाचा चालक जॉर्डन कूपर याला सांगितलं. त्यानंतर त्याने काही सफाई कर्मचारी जेम्सच्या मदतीला पाठवले. या सफाई कर्मचाऱ्यांनी कचऱ्याचा ढिगारा उपसायला सुरुवात केली आणि मोठ्या कठीण प्रयत्नानंतर जेम्सची अंगठी शोधून काढली. 

कूपर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जेम्ची अंगठी कचऱ्याच्या चिखलात पडली होती आणि ती पूर्णपणे चिखलाने माखली होती. सुरुवातीला पाहता क्षणी ही अंगठी एका कचऱ्यातील तुकड्या प्रमाणं वाटत होती. मात्र, ती बाहेर काढल्यानंतर आणि तिला जवळून पाहिल्यानंतर ती एक खास अंगठी असल्याचं आमच्या लक्षात आलं.  

नॉर्थ टाईनसाईड काऊन्सिलनं ही बातमी आपल्या फेसबूक पेजवर शेअर केली आणि ही कामगिरी फत्ते करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ही कामगिरी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे फोटो आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे फोटोही काउन्सिलनं शेअर केले असून यातील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एका सुपरहिरोचं चित्र दाखवलं असून त्याच्या हातात अंगठी असल्याचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT