Interpol steps into the investigation of the attack on comedian Kapil Sharma’s café, adding global attention to the Mumbai case. esakal
ग्लोबल

Kapil Sharma Cafe Attack Interpol Investigation: कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ला प्रकरणात आता ‘इंटरपोल’ची एन्ट्री!

Interpol joins Kapil Sharma cafe attack probe: एफबीआयने अमेरिकेतून रणदीप मलिकला केली अटक; जाणून घ्या, नेमका कोण आहे तो?

Mayur Ratnaparkhe

Interpol Steps In for Kapil Sharma Cafe Attack Investigation: कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ल्याच्या प्रकरणात आता इंटरपोलने एन्ट्री केली आहे. सुरक्षा एजन्सीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेत या प्रकरणाची चौकशी करत असताना, एफबीआयने रणदीप मलिकला अटक केली आहे. रणदीप हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. 

सुरक्षा एजन्सींच्या सूत्रांनुसार, रणदीप हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. तो दिल्लीतील हाय-प्रोफाइल नादिर शाह हत्याकांडात वाँटेड होता. तो अमेरिकेतून लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करत होता. सध्या यूएस इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट त्याची चौकशी करत आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ला प्रकरणात त्याचा सहभाग असण्याची शक्यता आहे. कपिल शर्माच्या कॅनडास्थित 'कॅप्स कॅफे'वर दोनदा गोळीबार झाला आहे.

कॉमेडियन कपिल शर्माला(kapil Sharma) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या मिळाल्या आहेत. कॅफेवरील हल्ल्यानंतर कपिल शर्माची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर एनआयए रणदीप मलिकचाही शोध घेत होती. तो अमेरिकेत बसून भारतात दहशत पसरवत होता आणि टोळीत नवीन सदस्य जोडण्याचे काम करत होता.

तपास यंत्रणांना आशा आहे की रणदीपकडून भारतात लपलेल्या लॉरेन्सच्या साथीदारांची माहीत मिळेल. लवकरच या प्रकरणात भारतात आणखी अनेक अटक होऊ शकतात.

कॅनाडातील सरे शहरात कपिल शर्माचा कॅफे आहे. या कॅफेवर बुधवारी पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. गोल्डी ढिल्लन नावाच्या व्यक्तीने या हल्ल्याची जबाबादारी घेतली आहे. गोल्डी ढिल्लन हा लॉरेंस बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे. महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आल होती. तर स्थानिक पोलीस या हल्ल्यांचा तपास करत आहेत.

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Bike Accident : मोटरसायकलच्या अपघातात देशमुख विद्यालयाचे लिपिक जागीच ठार; २ जण गंभीर जखमी

Jintur News : कुंभारी गावच्या सरपंच पार्वतीबाई हरकळ यांचा देशाच्या राजधानीचत सन्मान

Latest Marathi News Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा 'एमआयएम'ला धक्का!

Sachin Tendulkar: 'आभ्यासच करत नाही!' जेव्हा सचिनने सुरेश रैनाला स्वत:चा मुलगा म्हणत केलेली एअर हॉस्टेससोबत मस्करी

SCROLL FOR NEXT