India-Canada Esakal
ग्लोबल

India-Canada: इंदिरा गांधींनीही कॅनडा सरकारला केली होती दहशतवाद्यांवर कारवाईची मागणी; जस्टिन ट्रुडोंच्या वडिलांनी दिलेला नकार

ज्या दहशतवाद्याला इंदिरा गांधींनी सोपवण्यास नकार दिला होता

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारत आणि कॅनडातील संबध तणावपुर्ण होत आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंगच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी काल केला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढत चालला आहे. एकीकडे कॅनडाने भारताच्या उच्चपदस्थ आधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी भारतानेही प्रत्युत्तर देत कॅनडाच्या उच्चपदस्थ आधिकाऱ्यांची हकालपट्टी करून पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगितले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मात्र, खलिस्तानी दहशतवादावरून दोन्ही देश आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कॅनडाने अनेकवेळा खलिस्तानींचा बचाव केला आहे. 1982 मध्ये जस्टिन ट्रूडो यांचे वडील आणि कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान पियरे ट्रूडो यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेली खलिस्तानी दहशतवादी तलविंदर सिंग परमार यांच्या प्रत्यार्पणाची विनंती फेटाळली होती.

खलिस्तानींचा बचाव

नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी जस्टिन ट्रुडो यांच्याकडे कॅनडात सातत्याने वाढत असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे वडील आणि तत्कालीन पंतप्रधान पियरे ट्रुडो यांची आठवण करून दिली आहे. पियरे ट्रूडो हे 1968 ते 1979 आणि 1980 ते 1984 पर्यंत दोनदा कॅनडाचे पंतप्रधान होते.

इंदिरा गांधींची विनंती फेटाळण्यात आली

भारताने 1982 मध्ये खलिस्तानी दहशतवादी तलविंदर परमारच्या प्रत्यार्पणाची विनंती कॅनडाला केली होती. पण तत्कालीन पंतप्रधान पियरे ट्रुडो यांनी सबब सांगून तलविंदरचे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला. तलविंदर सिंग परमार हा भारतातील वॉन्टेड दहशतवादी होता.

याच तलविंदर सिंगने 1985 मध्ये एअर इंडियाचे कनिष्क विमान टाईमबॉम्बने उडवले होते. या स्फोटात विमानातील 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक 268 कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता.

कॉमनवेल्थ देशांदरम्यान प्रत्यार्पण प्रोटोकॉल लागू होणार नाहीत या कारणास्तव कॅनडाच्या पियरे ट्रूडो सरकारने तलविंदर परमारच्या प्रत्यार्पणाची भारतीय विनंती नाकारली होती.

एअर इंडियाचे कनिष्क विमानावरील हा हल्ला 9/11 च्या हल्ल्यानंतरचा सर्वात भीषण हवाई दहशतवादी हल्ला होता. दहशतवादी परमिंदर परमारला भारताच्या ताब्यात न दिल्याने लोक या हल्ल्यासाठी पियरे ट्रूडो यांना जबाबदार धरू लागले. कारण कॅनडाच्या सरकारने प्रत्यार्पण करण्यास नकार दिल्यानंतरच परमारने हल्ल्याची तयारी सुरू केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT