kim jong un esakal
ग्लोबल

Kim Jong Un : सैनिकाकडून 653 गोळ्या गायब; हुकूमशहाचा संपूर्ण शहरात Lockdown चा आदेश

उत्तर कोरियातून (North Korea) एक धक्कादायक बातमी समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

ही घटना रियांगगँगच्या उत्तर भागातील हेसन शहरात घडलीये. या शहरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळं दोन लाख लोकसंख्या घरात कैद झाली आहे.

उत्तर कोरियातून (North Korea) एक धक्कादायक बातमी समोर आलीये. इथं हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी एका शहरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलाय.

कारण, या शहरातील एका सैनिकाकडून 653 बंदुकीच्या गोळ्या (Bullets) गायब झाल्या आहेत. आता त्या शोधण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

रेडिओ फ्री एशियानं (Radio Free Asia) दिलेल्या वृत्तानुसार, 7 मार्चला लष्कर जवान माघारी येत असताना 653 बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्या. जोपर्यंत सर्व गोळ्या सापडत नाहीत, तोपर्यंत शहरात लॉकडाऊन राहील, असा आदेशचं शासनानं काढला. सध्या पोलीस आणि लष्कर दोघं मिळून त्याचा शोध घेत आहेत. मात्र, 10 दिवस उलटून गेले तरी अद्याप या गोळ्या सापडलेल्या नाहीत.

रेडिओ फ्री एशियाच्या वृत्तानुसार, ही घटना रियांगगँगच्या उत्तर भागातील हेसन शहरात घडलीये. या शहरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळं दोन लाख लोकसंख्या घरात कैद झाली आहे. बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्यापासून सैनिकांची शोध मोहीम सुरू आहे. अधिकारी घरोघरी शोधमोहीम राबवत आहेत.

अहवालानुसार, 7 मार्च रोजी कोरियन पीपल्स आर्मी 7 वी बटालियन या भागातून परतली. कोविड-19 साथीच्या सुरूवातीला चिनी सीमा बंद करण्यासाठी 2020 मध्येच 7 वी बटालियन तैनात करण्यात आली होती. कोरोनाचं संकट संपल्यानंतर लष्कराला माघारी बोलावण्यात आलं. दरम्यान, गोळ्या गायब झाल्या.

सुरुवातीला स्वत: जवान गोळ्यांचा शोध घेण्यात व्यस्त होते, पण गोळ्या काही सापडल्या नाहीत. तेव्हा अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर लॉकडाऊन लागू करून संपूर्ण शहर सील करण्यात आलं. वृत्तानुसार, संपूर्ण शहर सील करण्यात आलं आहे. पोलिस आणि लष्कराकडून घरोघरी झडती सुरू आहे. मात्र, तपास सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरी कोणताही सुगावा लागलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT