Maryam Nawaz and navaz sharif viral video  sakal
ग्लोबल

Maryam Nawaz: वडिलांच्या पायांना स्पर्श केल्याने पाकिस्तानी महिला मुख्यमंत्री झाली ट्रोल, हिंदू धर्माशी...!

नवाज शरीफ यांचे कुटुंब भारतातून आले होते. त्यामुळे आजही हे लोक पाया पडतात आणि आशीर्वाद घेतात असे म्हणत आहेत | Nawaz Sharif family came from India. people are saying that they fall down and seek blessings...

Chinmay Jagtap

Maryam Nawaz: पाकिस्तानच्या पीएमएलएन पक्षाच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांनी इतिहास रचला. त्या पाकिस्तानच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. मात्र त्या पकिस्तानमध्ये ट्रोल होत आहेत. याचे कारण म्हणजे त्या आपले वडील माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाया पडल्या.

सध्या पकिस्तानमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात मरियम नवाज या वडील नवाज शरीफ यांच्या पाया पडत आहेत. शेअर केलेल्या व्हिडीओचे कॅप्शन आहे. 'ही (पाय स्पर्श) प्रथा कोणत्या धर्मात आहे?'

काही लोक मरियमच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. तर काही तिला ट्रोल करत आहेत. या कृतीचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे आहे असे काहींचे म्हणने आहे. तर काही कट्टरपंथी याचा संबंध हिंदू धर्माशी जोडत आहेत.(Maryam Nawaz Trolled)

इम्रान खानचे समर्थक करत आहेत ट्रोल

व्हिडियोच्या माध्यमातून मरियमला ​​इम्रान खान यांचे समर्थक ट्रोल करत आहेत. काहीच्या मते इस्लामवर विश्वास असलेले लोक फक्त अल्लाहसमोर आपले डोके झुकवतात. कोणत्याही व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे हा गुन्हा मानला जातो. यामुळे मरियमला ट्रोल केले जात आहे. आणि यावेळी नवाज शरीफ यांचे कुटुंब भारतातून आले होते. त्यामुळे आजही हे लोक पाया पडतात आणि आशीर्वाद घेतात असे म्हणत आहेत. (Nawaz Sharif history)

मरियम शरीफ नक्की आहेत तरी कोण? (Who is Maryam Nawaz)

मरियम नवाज शरीफ या पाकिस्तानी राजकारणी आहेत. त्या पंजाबच्या मुख्यमंत्री आहेत. पाकिस्तानातल्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT