libya floods Update flood kills 20000 people derna city marathi news  
ग्लोबल

Libya Floods Update : लीबियात अभूतपूर्व संकट! महापुरात आत्तापर्यंत २० हजार लोकांचा मृत्यू

रोहित कणसे

लीबियात आलेल्या भीषण पुरामुळे २० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनांची चौकशी करण्यात यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. लीबियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आपत्ती असून यात मारल्या गेलेल्यांचे मृतदेहही सापडत नाहीयेत.

दरम्यान लीबियातील पुरस्तिथीत बचाव कार्य करत असलेल्या लोकांचे लोकांनी दिलेलल्या माहितीनुसार, समुद्राचे पाणी शहरात शिरले आणि त्याच्या पाण्यासह बरेच लोक वाहून गेले. यातील बहुतेकांचा मृत्यू झाल्याचे मानले जात असले तरी मृतदेह शोधणे कठीण होत आहे. लीबियातील डेरना शहराचा जवळपास अर्धा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

डेरना शहराचे महापौर अब्दुलमेनाम अल-घाइठी यांनी सांगितले की, शहरातील मृतांचा आकडा १८ ते २० हजारांवर पोहोचला आहे. इतकेच नाही तर आता महामारी पसरण्याची मोठी भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेह पाण्यात सडत असून पाण्यासह रस्त्यावर घाण वाहत आहे. त्यामुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, जागतिक हवामान संघटनेचे म्हणणे आहे की, लीबियातील इतके मृत्यू टाळता आले असते. लीबियात गेल्या दशकभरापासून यादवी युद्ध सुरू असून तेथे दोन वेगवेगळी सरकारे प्रशासन चालवत आहेत. देशात हवामान विभाग देखील कार्यरत नाही.

देशात हवामान विभाग जर सक्रीय असता तर त्यांच्यावतीने काही अंदाज वर्तवले गेले असते तर लोकांना वाचवता आले असते. पुराचा अंदाज वेळीच स्पष्ट झाला असता तर लोकांना आधीच कुठेतरी हलवण्यात आले असते, असे जागतिक संघटनेने म्हटले आहे. याशिवाय बचावकार्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळाला असता. याशिवाय डेरमा हे शहराला धोका असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले होते. शहरात काही बंधारे बांधावेत, अन्यथा समुद्रकिनारी असलेल्या या शहराला केव्हाही भीषण आपत्तीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला होता.

लीबीयामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या डेरमा शहराला पुराचा भीषण फटका बसला आहे. येथे अवघ्या काही मिनीटात अनेक बड्या इमारतू वाहून गेल्याचे पाहायलमा मिळाले. शेकडो कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. कित्येक कुटुंबातील एकही सदस्य जीवंत राहिला नाही. शहरात मृतदेहांचे सामुहिक दफन करण्यात येत आहे. जेसीबीच्या मदतीने कबरी खोदल्या जात आहे. आफ्रिकेतील देश लीबिया मागील १० वर्षांपासून गृहयुद्धाने होरपळून निघाला आहे. त्यानंतर आता पूरामुळे देशातील परिस्थीती गंभीर बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT