In living with the virus local govts preparedness will be key says WHO Covid envoy 
ग्लोबल

कोरोनाशी जुळवुन घ्या; दोन वर्षे लस निघणे अशक्य : जागतिक आरोग्य संघटना

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनावरील औषधासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू असले तरी जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी कोरोनावरील लस येण्यासाठी दोन वर्ष लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येकानं करोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. डेव्हिड नाबारो म्हणाले की, 'भारतीय नागरिक कोरोनाशी जुळवून घेत जगू शकतो. अशाच पद्धतीच्या जीवनशैलीनं कोरोनाला बाजूला ठेवता येऊ शकतं. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाविषयी शिक्षित करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतानं ज्या पद्धतीनं कोरोनाची परिस्थिती हाताळली, त्यातून पुढील टप्प्याला यशस्वीपणे सामोरं जाण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला आहे. उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे भारतातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जगाच्या तुलनेत कमी आहे. भारतातील रुग्णसंख्या दुप्पटीचा वेग ११ दिवसांचा आहे. हा कालावधी म्हणजे प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी चांगली संधी आहे, असेही डेव्हिड म्हणाले. त्यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.

जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण

नाबारो पुढे म्हणाले, मला हे सांगायचं की, हा विषाणू न रोखता जगभरात पसरू दिला, तर अनेक लोकांना संसर्ग होईल. त्याचबरोबर असंख्य लोक मरण पावतील. कोरोनाविषयी सगळ्या गोष्टी अजून आपल्याला समजू शकलेल्या नाहीत. हा आजार श्वसन विकाराबरोबरच शरीरावर परिणाम करू शकतो. कोरोनावरील लस पुढील दोन वर्षे तरी माणसाच्या मदतीला येणार नाही. त्यामुळे मी प्रत्येकालाच दोन वर्ष तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेत जगणं शिकायला हवं. पृथ्वीवरील ७.८ मिलियन लोकांनी तशी सवय लावून घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT