Lockdown-Britain 
ग्लोबल

ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा

पीटीआय

लंडन - ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी संपूर्ण देशात दुसऱ्या ‘स्टे ॲट होम’ लॉकडाउनची घोषणा केली. गुरुवारपासून (ता. ५) याची अंमलबजावणी होणार असून हा लॉकडाउन चार आठवडे असणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आरोग्य विभाग आणि रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

आपल्या सरकारी निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जॉन्सन म्हणाले की, निसर्गासमोर शरण जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आताच कठोर उपाययोजना केली नाही तर मृत्यूदर आणखी वाढू शकतो. तुम्ही आता घरीच थांबायला हवे. केवळ शाळा आणि कामासाठीच बाहेर पडण्यास परवानगी आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही काम नसेल तर घरीच बसा. नव्या लॉकडाउन अंतर्गत जीवनावश्‍यक नसलेल्या वस्तूंची दुकाने, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट, बार, पब हे सर्व बंद राहणार आहेत. पार्सल मागविण्याची सोय नागरिकांना असेल. केवळ एकाच व्यक्तीला दुसऱ्यांच्या घरी जाऊन भेटायची मुभा आहे. पहिल्या ‘स्टे ॲट होम’ लॉकडाउनमध्ये शाळा, महाविद्यालयेही बंद होती. यंदा मात्र त्यांना बंदीतून वगळले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT