Walmart Made-In-India Bicycle eSakal
ग्लोबल

Walmart Bicycle : आता अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये मिळणार 'मेड इन इंडिया' सायकल; राजदूत संधूंनी व्यक्त केला आनंद

Taranjit Singh Sandhu : 'मेक इन इंडिया, मेक फॉर दि वर्ल्ड', असं संधू यावेळी म्हणाले.

Sudesh

Made in India Bicycles in US Walmart : अमेरिकेतील मोठ्या शॉपिंग मॉल चेन असणाऱ्या वॉलमार्टमध्ये आता 'मेड इन इंडिया' सायकल मिळणार आहेत. यूएसमधील भारताचे राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते या सायकलींचं लाँचिंग करण्यात आलं.

यानंतर संधू यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून याबाबत माहिती शेअर केली. "मेक इन इंडिया, मेक फॉर दि वर्ल्ड! वॉलमार्टमध्ये अमेरिकेतील पहिल्या भारतीय बनावटीच्या सायकल्सच्या लाँचिंगला उपस्थित राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं." अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली. हीरो सायकल्सने लुधियानामध्ये या सायकल बनवल्या आहेत, असंही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं.

वॉलमार्टने यापूर्वीच याबाबत माहिती दिली होती. अमेरिकेतील काही ठराविक वॉलमार्ट स्टोअर्समध्ये हॉलिडे सीझनपूर्वी, म्हणजेच ख्रिसमसपूर्वी मेड-इन-इंडिया सायकल उपलब्ध होतील असं कंपनीने स्पष्ट केलं होतं. या सायकल हीरो इकोटेक लिमिटेड कंपनीने बनवल्या आहेत. महिला आणि पुरूष दोघांसाठी वेगवेगळे मॉडेल उपलब्ध करण्यात आले आहेत. 'क्रूझर स्टाईल' प्रकारची ही सायकल आहे.

हीरो ही भारतातील अग्रगण्य सायकल उत्पादक आणि एक्सपोर्टर कंपनी आहे. हीरोच्या सायकल या जवळपास 80 देशांमध्ये पाठवल्या जातात. हीरोसोबतच अन्य काही कंपन्या देखील वॉलमार्टसोबत करार करण्याच्या प्रयत्नात आहेत. 2027 सालापर्यंत भारतातून अमेरिकेत वार्षिक 10 बिलियन डॉलर्सची निर्यात करण्याचं देशातील कंपन्यांचं लक्ष्य आहे.

वॉलमार्ट देखील मेक इन इंडिया अभियानाला पाठिंबा देत आहे. यामध्ये योगदान म्हणून कंपनी 50,000 MSME कंपन्यांना पाठबळ देण्याबाबत काम करत आहे. यासाठी 'वॉलमार्ट वृद्धी' ही योजना राबवण्यात येत आहे. 2019 पासूनच वॉलमार्ट यासाठी प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT