saurabh chandrakar 
ग्लोबल

Mahadev App : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रमोटर चंद्राकर दुबईत नजरबंद, लवकरच होऊ शकते अटक

सध्या नजरकैदेत असलेल्या चंद्राकर याला बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, त्याच्या हलचालींवर नजर ठेवली जात आहे.

रोहित कणसे

महादेव बेटिंग अ‍ॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याला लवकरच पकडून भारतात आणले जाऊ शकते.संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या अधिकाऱ्यांनी चंद्राकर याच्या लोकेशनचा तपास लागला असून त्याला नजरबंद करण्यात आले आङे.

चंद्राकर हा महादेव ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील दोन मुख्य आरोपी मालकांपैकी एक आहे.या प्रकरणाचा संबंध मनी लॉन्ड्रींगशी असून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. चंद्राकर दुबईमधून त्याचा धंदा चालवत होता.

सध्या नजरकैदेत असलेल्या चंद्राकर याला बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, कारण तो देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे. सध्या त्याच्या हलचालींवर नजर ठेवली जात आहे. महादेव अ‍ॅप केस एक हाय प्रोफाईल घोटाळा असून यामध्ये एका ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोकर, कार्ड गेम, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट अशा अनेक खेळांवर सट्टा लावला जाऊ शकतो.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ईडीच्या विनंतीनुसार, इंटरपोलने सौरभ चंद्राकरबाबत रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. युएई या रेड कॉर्नर नोटीसनंतर याप्रकरणात कारवाई करत आहे. भारतीय अधिकारी चंद्रकरला भारताकडे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करतात याची सध्या दुबई पोलिस वाट पाहात आहेत, जेणेकरून ते त्याला तात्काळ अटक करू शकतील. भारताने यूएईसोबत प्रत्यार्पण करार केला आहे, ज्यामुळे चंद्राकरला भारतात आणणे सोपे होणार आहे.

प्रकरण काय आहे?

छत्तीसगडमधील रायपूर येथील मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणाच्या आधारे महादेव अॅपचा प्रमोटरसौरभ चंद्राकर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू आहे. हा तपास देशाच्या केंद्रीय यंत्रणांकडून केला जात आहे. तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल नावाचा आणखी एक प्रमोटर युएईमधील त्यांच्या कार्यालयातून महादेव बेटिंग अ‍ॅप ऑपरेट करायचे.

या दोघांनी या अ‍ॅपद्वारे मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहार केले आहेत. या प्रकरणात किमान 6000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. उप्पलला डिसेंबरच्या सुरुवातीला दुबईत स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. उप्पलला भारतात आणण्यासाठी अधिकारी यूएईच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यावेळी तपास यंत्रणेने सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT