Malaysia Lockdown Google file photo
ग्लोबल

मलेशियात कोरोनाची तिसरी लाट; देशव्यापी लॉकडाउन लागू

आतापर्यंत मलेशियातील ५ लाख ८७ हजार १६५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तेथे सध्या ८२ हजार २७४ सक्रिय रुग्ण आहेत.

वृत्तसंस्था

आतापर्यंत मलेशियातील ५ लाख ८७ हजार १६५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तेथे सध्या ८२ हजार २७४ सक्रिय रुग्ण आहेत.

क्वालालंपूर : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने हैराण झालेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. दुसरीकडे मलेशियात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने तडाखा दिला असल्याने तेथे तिसऱ्यांदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाउनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. ()

न्यूज एशिया वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (ता.२) मलेशियात १२६ मृत्यूंची नोंद झाली. गेल्यावर्षीपासून कोरोनाने थैमान घातल्यापासून ही आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी ठरली आहे. याआधी २९ मे रोजी मलेशियात सर्वाधिक ९८ मृतांची नोंद झाली होती. मलेशियात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता १ जूनपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी मृत्यू झालेल्या १२६ पैकी १२३ नागरिक हे मलेशियाचे होते, तर उर्वरीत ३ परदेशी नागरिक होते. मलेशियात आतापर्यंत कोरोनामुळे २ हजार ९९३ जणांचा बळी गेला आहे. बुधवारी दिवसभरात ७ हजार ७०३ नवे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत मलेशियातील ५ लाख ८७ हजार १६५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तेथे सध्या ८२ हजार २७४ सक्रिय रुग्ण आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येदरम्यान मलेशियातील ८२ हजार ३४१ नवजात बालकांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संक्रमितांपैकी १९ हजार ८५१ मुले ही ४ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाची, तर ८ हजार २३७ मुले ही ५ ते ६ वर्षांच्या दरम्यानची होती.

घुसखोरीबद्दल मलेशिया चीनवर नाराज

दुसरीकडे, चीनच्या १६ लढाऊ विमानांनी हवाई हद्दीचा भंग करत मलेशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यामुळे मलेशिया सरकार नाराज असून त्यांनी राजनैतिक मार्गाने निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या राजदूताला लवकरच पाचारण करून ही नाराजी व्यक्त केली जाईल, असे मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. चिनी विमानांनी मलेशियाच्या सार्वभौमतेला धक्का पोहोचवला असल्याची तक्रार मलेशियाने केली आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसह उपनगरात मुसळधार, अनेक भागात साचलं पाणी; लोकलसेवा विस्कळीत, पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल तिपटीने वाढले; चालकांमध्ये नाराजी

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

SCROLL FOR NEXT