Maldives President Muizzu Esakal
ग्लोबल

Maldives President Muizzu: मालदीवच्या अध्यक्षांवर काळी जादू करण्याचा प्रयत्न, राज्यमंत्र्यांसह तिघांना अटक, काय आहे प्रकरण?

Maldives President Muizzu: मालदीवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालदीव पोलिसांनी राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांच्यावर कथितपणे काळी जादू करण्याच्या आरोपाखाली देशातील एका मंत्र्याला अटक करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मालदीवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालदीव पोलिसांनी राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांच्यावर कथितपणे काळी जादू करण्याच्या आरोपाखाली देशातील एका मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. मालदीवमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पर्यावरण राज्यमंत्री फातिमा शमानाझसह अन्य दोन जणांना मुइझ्झूच्या जवळ जाण्यासाठी जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तिघांनाही अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्रानुसार, मंत्री शमनाजचा भाऊ आणि अन्य एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शमनाज या राष्ट्रपती कार्यालयाचे मंत्री ॲडम रमीझ यांच्या माजी पत्नी आहेत. शमनाजला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. पोलिसांनी घरातून काही वस्तूही जप्त केल्या आहेत.

मंत्री शमनाज यांच्या घरातून काळ्या जादूशी संबधित वस्तुही केल्या जप्त

पोलिस प्रवक्ते अहमद शिफान यांनीही मंगळवारी मंत्री शमनाझसह इतर दोन लोकांच्या अटकेची पुष्टी केली आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी शमानाझच्या घरावर छापा टाकला आणि अनेक वस्तू जप्त केल्या ज्या काळी जादू करण्यासाठी वापरल्या जातात अशी माहिती समोर आल्या आहेत.

आरोपी मंत्र्याने मुइझ्झूसोबत अनेक पदांवर केलं होतं काम

एप्रिलमध्ये पर्यावरण मंत्रालयात बदली होण्यापूर्वी शमनाज यांनी राष्ट्रपती भवनात मुइझ्झूसाठी राज्यमंत्री म्हणून काम केले होते, ज्यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवड झाली होती. त्यांनी यापूर्वी मालेच्या नगर परिषदेवर मुइझ्झूसोबत काम केले होते आणि मुइझ्झू महापौर असताना नगर परिषद सदस्य म्हणून काम केले होते.

मालदीवमध्ये यापूर्वीही असाच प्रकार घडला आहे

इस्लामिक कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जात असूनही, काळी जादू, स्थानिक पातळीवर फंडिता किंवा सिहुरू म्हणून ओळखली जाते. मे महिन्यात, संसदीय निवडणूक लढवणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यावर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली होती. डिसेंबर 2015 मध्ये, इस्लामिक मंत्रालयाने एक सार्वजनिक निवेदन जारी करून चेतावणी दिली की समाजात काळी जादू खूप सामान्य होत आहे आणि अशा प्रथांपासून दूर राहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT