Maldivian government has asked India to withdraw its military presence from the nation amid a diplomatic row 
ग्लोबल

India-Maldives: 15 मार्चपर्यंत सैन्य परत बोलावून घ्या; मालदीव सरकारची भारताला डेडलाईन

चीनच्या दौऱ्यावरुन परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू हे भारताविरोधात कठोर होताना दिसत आहेत. मुइझू यांनी मालदीवमधील भारतीय सैन्य परत बोलवण्याचा जुना राग पुन्हा छेडला आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- चीनच्या दौऱ्यावरुन परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू हे भारताविरोधात कठोर होताना दिसत आहेत. मुइझू यांनी मालदीवमधील भारतीय सैन्य परत बोलवण्याचा जुना राग पुन्हा छेडला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विषयी मालदीवमधील तीन उपमंत्र्यांनी अवमानकारक भाषा वापरली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे.( Maldivian government has asked India to withdraw its military presence from the nation amid a diplomatic row)

मुइझू सरकारने मालदीवमधील भारतीय सैन्य परत बोलवण्याचा प्रस्ताव भारताकडे पाठवला आहे. मालदीवने भारताला १५ मार्चपर्यंतचा वेळ दिला आहे. मुइझू ५ दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. चिनी पर्यटकांनी मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात यावं असं आवाहन यावेळी मुइझू यांनी केलं होतं.

चीनवरुन परत आलेल्या मुइझू यांचे वर्तन भारताविरोधात अधिक आक्रमक झाल्याचं दिसत आहे. त्यातूनच त्यांनी भारतीय सैनिकांना १५ मार्चपर्यंत पर्यंत परत बोलावण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. कारण, हिंद महासागरात चीन आपला प्रभाव वाढवू पाहत आहे. त्यात भारता शेजारी महत्त्वाच्या भौगोलिक क्षेत्रात असलेला मालदीवसारखा देश आपल्या विरोधात जाणे हिताचे ठरणार नाही.

मालदीवमध्ये निवडणुकीदरम्यान मुइझू यांच्या पक्षाने भारत विरोधात प्रचार केला होता. मालदीवमधील भारतीय लष्कराच्या बाबतही त्यांनी प्रोपेगेंडा केला होता. निवडणुकीदरम्यान मुइझू यानी जनतेला आश्वासन दिलं होतं की, सत्तेत आल्यास भारतीय सैनिकांना परत पाठवलं जाईल. निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच सैनिकांना परत बोलावण्याची औपचारिक विनंती भारत सरकारकडे केली होती.

मुइझू यांच्या आधीच्या सरकारच्या विनंतीनुसारच, भारतीय सैनिकांची छोटी तुकडी मालदीवमध्ये पाठवण्यात आली होती. ही भारतीय टीम समुद्री सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करते. मुइझू हे चीन समर्थक मानले जातात. चीनला फायद्याचे ठरतील असे निर्णय ते घेताना दिसत आहेत. पण, यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT