Viral Post Sakal
ग्लोबल

ज्या ताटात खाल्लं त्याच..! पाळलेल्या वाघाला खाऊ घालायला गेला अन् घात झाला; तिथेच बनली कबर

वाघ पाळले, त्यांना खायला घातलं पण शेवटी त्याचा खरा गुण आला बाहेर आणि घात झाला...

सकाळ डिजिटल टीम

मुक्या जनावरांना मदत करायला पाहिजे, एखादा संकटात असेल तर त्याला आपण मदत करायला पाहिजे, किंवा प्राणी कधीच केलेले उपकार विसरत नाहीत असे अनेक डायलॉग आपण ऐकले असतील. पण हे सर्वच प्राण्यांना लागू होत नाही. कधीतरी एखाद्या प्राण्याचा मूळ गुण समोर येतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

सध्या अशीच एक घटना समोर आली असून पाळलेल्या वाघाने मालकावर हल्ला केला आणि त्यालाच आपलं भक्ष्य बनवल्याची घटना घडली आहे. ही घटना युरोपातील स्लोवाकिया येथील ओस्करडा येथे घडली असून जोसेफ बी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आपल्या घरी खासगी प्राणीसंग्रहालय तयार केलं होतं.

अधिक माहितीनुसार, जोसेफ याने आपल्या घरी वाघाला पाळलं होतं. त्याच्याकडे त्यासाठी लागणारी परवानगी होती. पण मागच्या काही दिवसांत त्याने या प्राण्यांना व्यवस्थित खायला प्यायला दिले नाही. त्यामुळे हे प्राणी त्याच्यावर डोळा ठेवून होते. त्यानंतर तो पिंजऱ्यात वाघांना खायला देण्यासाठी गेला असता त्यांनी जोसेफवर हल्ला केला असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, १६ मे रोजी जोसेफचं निधन झालं असून त्याच्यावर पाळलेल्या जंगली प्राण्याने हल्ला केला आणि त्याला संपूर्णपणे खाऊन टाकल्याची माहिती आहे. शेजाऱ्यांना त्याची घरातील हालचाल न जाणवल्याने त्यांना संशय आला आणि तपासणी केली असता तो कुठेच दिसला नाही.

त्यानंतर त्याच्या प्राणीसंग्रहालयात त्याच्या शरीराचे दोन हाड दिसले. या हाडाची तपासणी केली असता ते जोसेफ या व्यक्तीचेच हाडे असल्याचं समोर आलं. प्राण्यांना मांस खाऊ घालायला गेल्यानंतर त्यालाच प्राण्यांनी मारून खाल्ल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण सिंह निर्दोष; कोर्टाने काय म्हटलं?

Gold Rate Today: ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव घसरले! उच्चांकापासून 36 हजारांनी स्वस्त; आजचा ताजा भाव पाहा

Kolhapur Illegal Abortion Case : 300 गर्भपातांची कबुली अन् 'मुलगाच' होण्याचे औषध! डॉ. गायकवाडच्या काळ्या कारनाम्यांचा कोल्हापुरात भांडाफोड, 40 महिलांची नावे पोलिसांच्या हाती

Pune Miraj Railway:‘रेल्वे’चे कुंपण शेतकऱ्यांच्या मुळावर! कऱ्हाड तालुक्यातील ४५ गावांचे शेतरस्ते बंद; शेतकरी झाले आक्रमक

Latest Marathi News Live Update : विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित

SCROLL FOR NEXT