Mark Zuckerberg Birthday e sakal
ग्लोबल

Mark Zuckerberg Birthday : जगप्रसिद्ध फेसबुकच्या मालकाला एकूण एवढ्या भाषा कळतात

संपूर्ण जगाला सोशल मीडियाशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावणारा मार्क झुकरबर्ग याचा आज वाढदिवस

सकाळ डिजिटल टीम

Mark Zuckerberg Birthday : संपूर्ण जगाला सोशल मीडियाशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावणारा मार्क झुकरबर्ग याचा आज वाढदिवस. फेसबुकबाबत काही चांगले किंवा वाईट घडल्यास आधी सगळ्यांच्या तोंडून नाव बाहेर पडतं ते मार्कचं. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. सध्या मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे. त्या बरोबर माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला २०१४ साली फेसबुक कंपनीने विकत घेतले.

मार्क झुकरबर्ग लहानपणापासून बुद्धीने हुशार होता यात काही वादच नाही. आणि त्यामुळेच फार कमी वयात त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र मार्कला एकूण किती भाषा येतात हे तुम्हाला माहिती आहे काय? मार्कला एक दोन नव्हे तर एवढ्या प्रकारच्या भाषा येतात. त्याचा जन्म १४ मे १९८४ मध्ये झाला. त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या काही खास गोष्टी.

Mark Zuckerberg Birthday

मार्कला किती भाषा येतात?

मार्कला एकूण सहा भाषा येतात. इंग्रजी, हिब्रू (Hebrew), फ्रेंच, लॅटिन, ग्रीक आणि मँड्रियन चायनिज. त्याचा तंत्रज्ञानातील अभ्यासही तगडा आहे. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या बुद्धीचातुर्याच्या बळावर नोव्हेंबर 2017 पर्यंत त्यांची संपत्ती 74.2 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी कमावली होती आणि 2016 मध्ये फोर्ब्सने जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणना केली होती. (Facebook)

मार्कच्या वयक्तिक आयुष्यातबाबत थोडक्यात

मार्कच्या पत्तीचे नाव प्रिस्कीला (Priscilla) आहे. त्याला दोन मुली आहेत. त्याच्या मुलींची नावं आहेत मॅक्स आणि ऑगस्ट. मार्क हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. आज मार्कला 39 वर्षे पूर्ण झालीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT