Mark Zuckerberg Birthday e sakal
ग्लोबल

Mark Zuckerberg Birthday : ज्या फेसबुकवर आपण टाईमपास करतो, त्याच्या जीवावर झुकरबर्ग झाला जगातला सर्वात श्रीमंत

३८ व्या वर्षी तो जगातल्या सर्वात श्रीमंत टॉप २० मधला सर्वात तरुण आणि ४५ वर्षांखालील एकमेव व्यक्ती आहे.

वैष्णवी कारंजकर

मार्क झुकरबर्गने हार्वर्डमधील मित्रांसह फेसबुकची स्थापना केल्याला जवळपास २० वर्षे पूर्ण झाली आहेत. २००३ मध्ये झुकरबर्गच्या कल्पनेवर आधारित, त्यांनी जानेवारी २००४ मध्ये thefacebook.com ही URL नोंदवली आणि फेसबुक सुरू झालं.

मेटा प्लॅटफॉर्मने फेब्रुवारी २०२३ मध्ये जारी केलेल्या त्रैमासिक अहवालानुसार, २०२२ च्या अखेरीस कॅम्पस साइट म्हणून फेसबुकचे २.९६ अब्ज मंथली युजर्स आहेत. महसूलात दरवर्षी साधारण २ टक्क्यांची वाढ होत आहे.

फोर्ब्सने ११ मे पर्यंतच्या अहवालात लिहिलं आहे की ८४ अब्ज डॉलर्स संपत्ती असलेल्या जगातल्या २० सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. ३८ व्या वर्षी तो टॉप २० मधला सर्वात तरुण आणि ४५ वर्षांखालील एकमेव व्यक्ती आहे.

२०१२ मध्ये, मार्क झुकरबर्गने त्याच्या फेसबुक पगार आणि बोनसमधून सुमारे 770,000 डॉलर्स कमावले. पुढच्या वर्षी, त्याने आपला वार्षिक पगार एक डॉलरने कमी केला. झुकरबर्ग त्याच्या रोजच्या नोकरीसाठी मोठा पगार मिळवत नसला तरी, कंपनी काही महत्त्वपूर्ण खर्चासाठी पैसे देते.

या वर्षी त्याच्या सुरक्षेसाठी आर्थिक वाटप १० दशलक्ष डॉलरवरून १४ दशलक्ष डॉलरपर्यंत वाढलं आहे. इलॉन मस्क सध्या २४६.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम डेटानुसार, गौतम अदानी १२८.७ अब्ज डॉलर्ससह या यादीत जगातील ५ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याच वेळी, मुकेश अंबानी १०७ अब्ज डॉलर्ससह या यादीत ७ व्या क्रमांकावर आहेत.

श्रीमंतांच्या या यादीत मार्क झुकरबर्ग, ७३.६ बिलियन डॉलर्ससह १४ व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: 7 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा इशारा

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT