Marrakeshs Earthquake
Marrakeshs Earthquake esakal
ग्लोबल

Marrakeshs Earthquake : मसाल्यापासून ते ऐतिहासिक वास्तूंपर्यंत ओळख असलेल्या माराकेशला भूकंपाचा फटका

सकाळ डिजिटल टीम

Marrakeshs Earthquake : मोरोक्कोमधील भूकंपाचा केंद्रबिंदू अॅटलस पर्वत होता, मात्र त्याची तीव्रता इतकी होती की येथून 72 किमी अंतरावर असलेल्या माराकेश शहरालाही त्याचा मोठा फटका बसला. या विध्वंसात दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे, इमारतींचे नुकसान झाले आहे आणि लोकांना रस्त्याच्या कडेला रात्र काढावी लागत आहे.

उत्तर आफ्रिकी देश मोरोक्कोमध्ये गेल्या शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण भूकंपाने हाहाकार माजवला आहे. मराकेश हे 8.50 लाख लोकसंख्या असलेले शहर देखील भूकंपाने प्रभावित झालं आहे. या शहराचा इतिहास जवळपास एक हजार वर्षांचा आहे. इथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत आणि हा देश जिरे, काळी मिरी, आले, हळद, केशर, दालचिनी, लाल मिरची आणि पांढरी मिरी यांसारख्या मसाल्यांसाठी देखील ओळखला जातो.

भूकंपाचा केंद्रबिंदू मारकेशपासून 72 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाय अ‍ॅटलास पर्वत रांगेत होता, परंतु त्याची तीव्रता 6.8 इतकी होती. परिणामी, देशाच्या इतर भागांसह, ऐतिहासिक शहर मारकेशलाही मोठा फटका बसला. येथे बरेच नुकसान झाले आहे. तिथून येणारे फोटो भीतीदायक आहेत. लोकांनी रस्त्याच्या कडेला उभं राहून रात्र काढली. स्थानिक सरकार आणि जगातील अनेक देश मदतीसाठी पुढे सरसावले आहेत परंतु त्यांना गरजूंपर्यंत पोहोचण्यास वेळ लागू शकतो. कारण मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मारकेश ही एकेकाळी मोरोक्कोची राजधानी होती.

देशातील चार शाही शहरांपैकी एक

हे देशातील चार शाही शहरांपैकी एक आहे. 1070 मध्ये शासक अमीर अबू बकर इब्न उमर यांनी राजधानी म्हणून त्याची स्थापना केली. कालांतराने, लाल वाळूच्या दगडाने बनलेल्या लाल भिंती आणि इमारतींमुळे हे शहर रेड सिटी किंवा गेरुआ सिटी म्हणूनही ओळखले जाऊ लागले. काही वर्षांतच माराकेश हे सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले.

या ठिकाणचे मदिना आणि जमा - अल - फना ही जागतिक वारसा स्थळ आहेत. 12 व्या शतकात बांधलेल्या कुतुबिया मशिदीचेही भूकंपात नुकसान झाले. हे केवळ मोरोक्कोमधीलच नव्हे तर संपूर्ण आफ्रिकन खंडातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक आहे. संपूर्ण मोरोक्को आणि त्याचे शहर माराकेश हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत.

ऐतिहासिक इमारती, उद्याने आणि बाजारपेठा

येथील ऐतिहासिक वास्तू, उद्याने, बाजारपेठा स्थानिक लोकांना तसेच पर्यटकांना आकर्षित करतात. परिणामी, अलीकडच्या काळात येथे हॉटेल्स आणि रिअल इस्टेटमध्ये तेजी आली आहे. हा देश बराच काळ फ्रान्सच्या ताब्यात असल्याने अनेक फ्रेंच लोक आजही येथे राहतात.

येथील पारंपारिक बाजारपेठांची संख्या, ज्यांना स्थानिक भाषेत सौक म्हणतात 18 आहे. या बाजारांना भेट दिल्याशिवाय कोणताही पर्यटक परत येत नाही. ही बाजारपेठ स्थानिक लोकांसाठी रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, अनेक विद्यापीठे, फुटबॉल क्लब इत्यादीही माराकेशची ओळख आहे. त्याची अत्याधुनिक ओळख स्ट्रीट सर्किट वर्ल्ड टूरिंग कार चॅम्पियनशिप, FIA फॉर्म्युला चॅम्पियनशिप आयोजित करत आहे.

दरवर्षी 20 लाखांहून अधिक पर्यटक येतात

20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, संपूर्ण मोरोक्को हे माराकेशचे राज्य म्हणून ओळखले जात होते. सादियन राजघराण्याच्या काळात या शहराने मोठी प्रगती पाहिली. सध्याच्या राजाने अलीकडच्या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिणामी, आता दरवर्षी 2 दशलक्षाहून अधिक पर्यटक माराकेश शहरात येत आहेत. माराकेशच्या भिंती आणि येथे बांधलेले ऐतिहासिक दरवाजे लोकांना आकर्षित करतात. मेनारा गार्डन, मेजरेल गार्डन आणि जलाशय देखील पर्यटकांना आकर्षित करतात. एल बादी पॅलेस, बाहिया पॅलेस, रॉयल पॅलेस, कौटूबिया मशीद, बेन युसेफ मशीद, कसबाह मशीद, बेन सलाह मस्जिद येथील वास्तुकला लोकांना आकर्षित करते.

मातीची भांडी वापरली जातात

माराकेश शहरात चारशेहून अधिक हॉटेल्स आहेत. शहरातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल 1925 मध्ये बांधलेले पंचतारांकित ममोनिया हॉटेल आर्ट डेको आहे. माराकेश म्युझियम, दार सी सैद म्युझियम आणि बर्बर म्युझियम व्यतिरिक्त, इतर अनेक संग्रहालये येथे आहेत, जी शहरातील प्राचीन संस्कृती आणि ऐतिहासिक तथ्यांची माहिती देतात. येथील हस्तकला, संगीत, नाट्य आणि नृत्यही आपली वेगळी छाप सोडतात. लिंबू, संत्री आणि ऑलिव्हची झाडं इथे मुबलक प्रमाणात आहेत. येथील खाद्यपदार्थ खास मसाल्यांसाठी ओळखले जातात. इथली स्वयंपाकाची कला खास मानली जाते कारण आजही स्वयंपाकासाठी इथे मातीची भांडी वापरली जातात. म्हणूनच चव पूर्णपणे वेगळी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT