media tycoon rupert murdoch to marry for the fifth time at the age of 92 years check details  
ग्लोबल

Rupert Murdoch News : वयाच्या 92 व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार मर्डोक; जाणून घ्या कोण आहे नवरी

सकाळ डिजिटल टीम

Rupert Murdoch News : जगभरातील मीडिया जगताचा बादशहा समजला जाणारा बिझनेसमन रुपर्ट मर्डोक पाचव्यांदा लग्न करणार आहे. वयाच्या 92 व्या वर्षी मर्डोक यांनी त्यांच्या 5 व्या लग्नाची घोषणा केली आहे. त्याने 66 वर्षीय माजी पोलीस अधिकारी अॅन लेस्ली स्मिथ यांच्याशी साखरपुडा जाहीर केला आहे.

कॅलिफोर्नियात आयोजित कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती, याच कार्यक्रमत हे दोघे एखमेकांच्या प्रेमात पडले. सप्टेंबरमध्ये झालेल्या या भेटीनंतर मर्डोकने सेंट पॅट्रिक डेच्या दिवशी स्मिथला 'प्रपोज' केलं होतं. आता या उन्हाळ्यात हे दोघे लग्न करणार आहेत.

मर्डोकने त्यांच्याच मालकिचे वृत्तपत्र 'न्यूयॉर्क पोस्ट'ला सांगितले की, मला प्रेमात पडण्याची भीती वाटत होती, पण मला माहित आहे की ते माझे शेवटचे प्रेम असेल. हे अधिक चांगले असेल. मी आनंदी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मर्डोक 2022 मध्ये त्यांची चौथी पत्नी जेरी हॉलपासून वेगळे झाले होते.

जेरी हॉल यांच्या शिवाय मर्डोकने याआधी आणखी तीन विवाह केले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियन फ्लाइट अटेंडंट पॅट्रिशिया बुकर, स्कॉटिश वंशाच्या पत्रकार अन्ना मान आणि चिनी उद्योगपती वेंडी डेंग यांच्याशी लग्न केले होते.

स्मिथ यांचे दिवंगत पती चेस्टर स्मिथ हे माजी गायक, रेडिओ आणि टीव्ही एक्झिक्युटिव्ह होते. स्मिथ यांनी न्यूजपेपरला सांगितले की मर्डॉकला भेटणे आणि त्याला आपला जीवन साथीदार म्हणून निवडणे ही देवाने त्याला दिलेली देणगी आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, मी 14 वर्षांपासून विधवा आहे. रुपर्टप्रमाणेच माझे पती व्यावसायिक होते, म्हणून मी रूपर्टची भाषा जाणते. आपण एका प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. महत्वाचे म्हणजे, मर्डोक यांना 6 मुले आहेत. ही सहा मुले त्यांच्या तीन बायकांची आहेत.

मर्डोकच्या व्यावसायिक साम्राज्याबद्दल बोलायचे झाले तर, फोर्ब्सनुसार, रुपर्ट मर्डोक हे न्यूज कॉर्पचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांच्याकडे सुमारे 17 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मर्डोककडे जगभरात शेकडो स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशन आउटलेट आहेत. यामध्ये यूकेमधील द सन आणि टाइम्स, द डेली टेलिग्राफ, ऑस्ट्रेलियातील हेराल्ड सन आणि द ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क पोस्ट यांचा समावेश आहे.

मर्डोक यांच्याकडे पुस्तक प्रकाशक हार्परकॉलिन्स आणि स्काय न्यूज ऑस्ट्रेलिया आणि फॉक्स न्यूज या टेलिव्हीजन प्रसारण चॅनेलची मालकी देखील आहे. तसेच त्यांच्याकडे 2018 पर्यंत स्काय, 2019 पर्यंत 21 सेंच्युरी फॉक्स आणि आता बंद झालेल्या न्यूज ऑफ द वर्ल्डचे देखील मालक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT