Salima Mazari 
ग्लोबल

तालिबान विरोधात महिलेने उभारली स्वत:ची 'आर्मी'

सकाळ वृत्तसेवा

अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरु असून त्यामुळे अशांतता पसरली आहे. तालिबानने महिलांना एकटं बाहेर निघण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, यामध्ये तालिबानींविरोधात मोहिमेवर निघालेल्या एका महिलेचा फोटो चर्चेत आहे

काबूल- अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरु असून त्यामुळे अशांतता पसरली आहे. तालिबानने महिलांना एकटं बाहेर निघण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, यामध्ये तालिबानींविरोधात मोहिमेवर निघालेल्या एका महिलेचा फोटो चर्चेत आहे. सलीमा मजारी असं तिचं नाव असून ती महिला जिल्हा गव्हर्नर आहे. तिने स्वत:ची आर्मी तयार केली आहे. यात तरुणांची भरतीसुद्धा करत आहे. सलीमा मजारी तरुणांना आवाहन करते की, अफगाणिस्तान आपली भूमी आहे. या भूमीसाठी बलिदान देणं ही अभिमानाची गोष्ट आहे. (International Latest News)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली तेव्हापासून अफगाणिस्तानात रक्ताचे पाट वाहत आहेत. देशाची वाताहत होणार अशीच परिस्थिती सध्या आहे. मानवाधिकारांची पायमल्ली करणं हेच तालिबानचं काम असल्याचं सलीमा मजारी यांनी म्हटलं होतं. अफगाणिस्तानच्या ज्या भागांवर तालिबानने ताबा मिळवला आहे तिथल्या लोकांची स्थिती आता खूपच बदलली आहे. मात्र, चारकिंटमध्ये असलेल्या पर्वत आणि खोऱ्यांमध्ये अजुनही सलीमा मजारी यांचे राज्य चालते. तिथे अजुनही अफगाणिस्तानचे सरकार आहे.

2001 मध्ये दहशतवाद्यांचा बीमोड केल्यानंतर अफगाणिस्तानात हळूहळू महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला होता. सामाजिकदृष्ट्या एका महिलेला नेता म्हणून स्वीकार करण्यासाठी देश तयार नव्हता. पण, हळू हळू परिस्थिती बदलली, असं सलीमा मजारी यांनी एएफपीला सांगितलं. तालिबान आपला सर्वात मोठा शत्रू कोणाला मानत असेल तर हजारा समुदायाला. या समाजाने नेहमी तालिबानला आव्हान दिलं आहे. सलीमा मजारी यासुद्धा याच समाजातील आहेत. यात मोठ्या प्रमाणावर शिया मुसलमान असतात. तर तालिबान हे सुन्नी आहे. शियांना तालिबान आणि इसिसकडून नेहमीच टार्गेट केलं गेलं आहे.

अफगाणिस्तानच्या राजधानीतील एका शाळेवरही हल्ला करण्यात आला होता. यात 80 पेक्षा जास्त मुलींचा मृत्यू झाला होता. आता यातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांवर तालिबानचा ताबा आहे तर उरलेल्या भागाच्या सुरक्षेसाठी सलीमा मजारी कार्यरत असते. दिवसभर त्या तालिबानविरोधात तरुणांची फौज उभा करण्यासाठी फिरतात. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या भागात तालिबानला येण्यापासून रोखलं आहे. मराजी यांच्या गाडीवर असणाऱ्या लाऊडस्पीकरवर एक प्रसिद्ध स्थानिक गाणे वाजत असते 'माझ्या प्राण प्रिय देशा, माझं जीवनही मी तुझ्यासाठी अर्पण करेन'

तालिबानला रोखण्यासाठी सलीमासोबत मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोक पुढे येत आहेत. यामध्ये शेतकरी, कामगारांचा समावेश आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे शस्त्रे नव्हती. त्यासाठी त्यांनी जमीन, जनावरे विकायला सुरु केले. लोकांनी तालिबानशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख सय्यद नजीर यांचे म्हणणे आहे की, तालिबानच्या ताब्यात न जाण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे स्थानिकांनी दिलेलं प्रत्युत्तर. आमच्या लोकांचा पाठिंबा हेच सध्या आमच्याकडे असलेलं भांडवल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT