ग्लोबल

Crime News : 23 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या, लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये घटना कैद; काय घडलं?

Valeria Marqueza Shot Dead : वलेरिया मार्केजवर लाइव्ह स्ट्रिमिंगवेळी गोळ्या झाडण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे तिच्या हत्येनंतर त्याच परिसरात कॅफेत एका माजी खासदाराचीही हत्या झाली.

सूरज यादव

मेक्सिकोतील जलिस्को इथं एका २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीची हत्या करण्यात आलीय. टीकटॉकवर लाइव्ह सुरू असतानाच तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जापोपान शहरात ही घटना घडली असून वलेरिया मार्केज असं हत्या झालेल्या इन्फ्लुएन्सर तरुणीचं नाव आहे. ब्युटी सलूनमध्ये टिकटॉक लाइव्ह सुरू असतानाच तिच्यावर गोळीबार झाला.

लाइव्ह स्ट्रीममध्ये वलेरिया मार्केज ही डिलिव्हरी बॉयसोबत बोलत होती. त्यावेळी अचानक तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तिच्या छातीवर आणि डोक्यात गोळ्या घुसल्या. यात तिचा जागीच मृत्यू झालाय. वलेरियाच्या डोक्यात गोळी लागताच रक्ताच्या चिळकांड्या समोरच्या टेबलवर पडल्या. तिच्या लाइव्ह स्ट्रिमिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे वलेरियाच्या हत्येनंतर काही तासात त्याच परिसरातील कॅफेत एका पक्षाच्या माजी खासदाराचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पीआरआय पक्षाचे माजी खासदार लुइस आर्मांडो कॉर्डोवा डियाज यांचीही हत्या झाली. या दोन घटनांमुळे खळबळ उडालीय.

वलेरिया मार्केज ही २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. ती सौंदर्य प्रसाधनांचे ऑनलाइन मार्केटिंग करत असे. इन्स्टाग्रामवर जवळपास दीड लाख तर टिकटॉकवरही तितकेच फॉलोअर्स होते. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT