mexico alien bodies was alive says doctors after scanning non human bodies eggs Found  
ग्लोबल

Mexico Aliens : मेक्सिकोमधील एलियन्स खरेच! कधीकाळी होते 'जिवंत', डॉक्टरांचा दावा; पोटातही मिळाले अंडे

रोहित कणसे

मेक्सिकोमध्ये एलियनचे मृतदेह सापडल्यावरून जगभरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच जगासमोर आलेल्या या दोन एलियन्सच्या मृतदेहांबद्दल मेक्सिकोमधील डॉक्टरांनी आता खळबळजनक दावे केले आहेत. या डॉक्टरांनी सांगितले की, सापडलेल्या दोन एलियन्स मृतदेहापैकी एक बराच काळ जिवंत होता. तसेच त्याचे सर्व अवयव हे बायोलॉजिकल होते आणि ते व्यवस्थितरित्या काम करत होते. तसचे त्याच्या शरीरात गर्भ विकसित होत असल्याचे पुरावे देखील मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


मेक्सिकोच्या हुइक्कलुकन येथे नूर क्लीनिकमध्ये या एलियन्सच्या शरिराचे सीटी स्कॅनिंग व एमआरआय करण्यात आले. तसेच अनेक वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. यानंतर डॉक्टरांनी दावा केला की या एलियनच्या शरिरात माणसांकडून कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये. ते त्यांच्या मूळ स्थितीत आहेत. त्यामुळे एलियन मृतदेहाचे हे अवशेष मानवनिर्मित नसल्याचं उघड झालं आहे.

मेक्सिकन नेव्ही ऑफीस सेक्रेटरी आणि हेल्स सायंसेस रिसर्च इंस्टीट्यूटचे डायरेक्टर जॉश जाल्श बेनिट्ज यांनी या एलियन मृतदेहांशी कुठलीही छेडछाड झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या एलियन्सच्या मृतदेहांवर त्यांचे मूळ ठिकाण शोधण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. मागील आठवड्यात मेक्सिकन पत्रकार जेमी मॉसन यांनी हे एलियन्स मेक्सिकोच्या काँग्रेसमध्ये दाखवले होते.

वैज्ञांनिकांनी केलेल्या चाचण्यानंतर दावा करण्यात आला आहे की, हे एलियन माणसांनी बनवलेल्या अप्राकृतिक किंवा कृत्रिम रचना नाहीयेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या एलियन्सच्या मृतदेहांपैकी एक एकेकाळी जिवंत होता. तसेच त्याचे शरीर हे आतून पूर्णपणे ठीक होते आणि त्याचे सर्व जैविक अवयव व्यवस्थित काम करत होते. तसेच यामध्ये गर्भ विकसित होण्याचे पुरावे देखील आढळले आहेत.

एलियनच्या पोटात मोठा घटक सापडला असून ज्याला डॉक्टर विकासशील गर्भधारणा मानत आहेत. किंवा कथितरित्या ते एलियन्सचे अंडे होते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

वैज्ञानिकांकडून या एलियन मृतदेहांची डीएनए चाचणी देखील करण्यात आली. त्यांची तुलना इतर १० लाख प्रजातींशी करण्यात आली. मात्र मानवाच्या माहितीतील कोणत्याही प्रजातीशी ते जुळून आले नाहीत. इतकेच नाही तर ते कुठलेही क्रॉस ब्रीड देखील नसल्याचे आढळून आले.

दरम्यान स्वतः एलियन आणि युएफओ एक्सपर्ट असल्याचा दावा करणारे पत्रकार जेमी मॉसन यांनी मागिल आठवड्यात हे दोन एलियन्स जगासमोर आणले होते. मेक्सिको सरकारचे अनेक बडे अधिकारी आणि काँग्रेसमधील लोक हे पाहण्यासाठी जमले होते. यावेळी हे एलियन दुसऱ्या गृहावरून आल्याचा दावा करण्यात आला होता. हे एलियन्सचे मृतदेह २०१७ मध्ये पेरूच्या जवळ सापडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT