car-driving 
ग्लोबल

'टिकटॉक'च्या इशाऱ्यामुळे ड्रायव्हरला समजलं संकट, मुलीची झाली सुटका

घरात कौटुंबिक हिंसाचार ( Violence at home) होत असेल, तर टिकटॉकवर (Tiktok) हाताद्वारे काही विशिष्ट पद्धतीचे इशारे केले जातात.

दीनानाथ परब

वॉशिंग्टन: घरात कौटुंबिक हिंसाचार ( Violence at home) होत असेल, तर टिकटॉकवर (Tiktok) हाताद्वारे काही विशिष्ट पद्धतीचे इशारे केले जातात. याचा अर्थ 'ती' व्यक्ती हिंसाचारामुळे त्रासली असल्याचे लक्षात येते. याच इशाऱ्यांमुळे केंचुकी पोलिसांनी नॉर्थ कॅरोलिनामधील (North Carolina) बेपत्ता असलेल्या एका मुलीची सुटका (Girl rescue) केली. या मुलीने टिकटॉकवरील सांकेतिक भाषेचा वापर करुन तिच्याबरोबर हिंसाचार होत असल्याची माहिती दिली.

उत्तर कॅरोलिनामधील एशविले मध्ये राहणारी ही १६ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारी तिच्या पालकांनी नोंदवली. गुरुवारी केंचुकीमधील एका व्यक्तीने ९११ वर फोन केला. एक मुलगी संकटात आहे, असा रिपोर्ट त्या व्यक्तीने केला.

"मुलगी ज्या गाडीमध्ये होती, त्याच गाडीच्यामागे तक्रारदाराची गाडी होती. ती हातवारे करुन काही इशारे देत होती. टिकटॉकवर हिंसाचाराला वाचा फोडण्यासाठी जे संकेत आहेत, तसे इशारे या मुलीने केले" लॉरेल काऊंटी शेरीफच्या ऑफीसने स्टेटमेंटमधुन ही माहिती दिली. सीएनएनने हे वृत्त दिले आहे.

टिकटॉकमुळे या मुलीला संकटात असताना, कशा पद्धतीने संकेत द्यायचे, हे कळलं होतं. ज्या माणासाने ९११ वर फोन करुन माहिती दिली, त्याने सात मैलापर्यंत गाडीचा पाठलाग केला. अखेर पोलिसांनी ती कार अडवली व मुलीची सुटका केली. संशयित पीडित मुलीला नॉर्थ कॅरोलिनावरुन ओहायोला घेऊन गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला गुरुवारी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Statement : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार? सुनिल तटकरे छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांनी केलं वक्तव्य

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

'देऊळ बंद'च्या त्या सीननंतर गश्मीरसोबत ४ दिवस बोलत नव्हती ऑनस्क्रीन लेक; कारण सांगत म्हणाली-

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटी प्रकरणात डॉ. मनोज शिरुरेला 5 दिवसांची CBI कोठडी

'बॉलिवूडमध्ये मराठी कलाकरांना घाटी म्हणतात' वैभव मांगले हिंदी सिनेसृष्टीबद्दल स्पष्टच बोलले... म्हणाले...

SCROLL FOR NEXT