corona vaccine 
ग्लोबल

नव्या कोरोनाला रोखण्यास आमची लस सक्षम; अमेरिकेतील कंपनीचा दावा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या अवतारामुळे जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा लशीच्या विकासावर तर परिणाम होणार नाही ना असा प्रश्‍न सामन्यांच्या मनातही निर्माण झाला असताना मॉडर्ना या कंपनीने आमची लस ही कोरोनाच्या नव्या विषाणूवर देखील प्रभावी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे अन्य कंपन्या देखील हाच दावा करताना दिसत आहेत.

कोरोनाच्या कोणत्याही अवताराविरूद्ध प्रभावी ठरणारी लस तयार करण्याचा निर्धार मॉडर्नाने व्यक्त केला असून अमेरिकेमध्ये या कंपनीने तयार केलेल्या लशीच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे. नव्या विषाणूविरोधात देखील ही लस तितकीच प्रभावी ठरेल, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. नव्या कोरोनाला लस रोखते की नाही याची पडताळणी करण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये तिच्या अतिरिक्त चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील गायींची काळजी; योगींना दिला सल्ला

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा शोध लागल्यापासून येथील निर्बंध कडक झाले असतानाच आणखी एक प्रकार आढळून आला असून त्याचा उगम दक्षिण आफ्रिकेत झाला असल्याचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेतही चार दिवसांपूर्वी नवा प्रकार आढळून आला आहे. मात्र, हा नवा प्रकार इतर दोन्ही नव्या प्रकारांपेक्षा वेगळा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ब्रिटनमध्ये दोन जणांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. हे दोघेही काही आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेवरून आले होते. ब्रिटनमध्ये आधीच नव्या विषाणूमुळे नवे निर्बंध लागू असून अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. हा विषाणू ७० टक्के संसर्गजन्य आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला नवा विषाणू हा याहून अधिक संसर्गजन्य असल्याचे दिसून येत आहे, असे हॅनकॉक यांनी सांगितले. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेवरून येणाऱ्यांना ब्रिटनमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.

कोरोनाच्या व्हॅक्सिनमध्ये गाईचं रक्त; हिंदू महासभेनं केलं लस न वापरण्याचं आवाहन

ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत विषाणूचा नवा प्रकार सापडल्यानंतर इतर अनेक देशांनी त्या देशांमधील नागरिकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. आता आणखी एक नवा प्रकार आढळल्यानंतर चिंता व्यक्त होत असली तरी त्यावर नियंत्रण मिळविण्याचा विश्‍वास ब्रिटनच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT