Modi Committed Fatal Mistake by Revoking Special Status of J&K Says Imran Khan 
ग्लोबल

मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : इम्रान खान

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मघाती चूक केली असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केली. मुझफ्फराबाद येथे पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरच्या विधिमंडळात बोलताना खान यांनी आरोप केला की, पाकिस्तानच्या मुद्‌द्‌याचा वापर करून मोदींनी निवडणुकीत बहुमत प्राप्त केले असून, त्या बळावरच त्यांनी कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोदींनी आत्मघाती चूक केली आहे. कलम 370 रद्द करून मोदींनी कधीही दुरुस्त करता येणार नाही, अशी चूक केली आहे. त्यांनी भारताला अशा ठिकाणी आणले आहे की, आता त्यांनी ठरविले तरी त्यांना मागे जाता येणार नाही. हिंदू राष्ट्रवादाचा जीन आता बाटलीतून बाहेर आलेला आहे, जो पुन्हा बाटलीत पाठविणे अशक्‍य आहे, अशी टीका खान यांनी केली. अशाच प्रकारच्या घटनांच्या साखळीतून अंतिमतः स्वतंत्र काश्‍मीर आकाराला येईल, असा दावाही खान यांनी केला.

फुल विक्रेत्याच्या खात्यात जमा झाले 30 कोटी रुपये; अन्...

काश्‍मिरी जनतेच्या समर्थनार्थ दरवर्षी पाच फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये काश्‍मीर एकता दिवस पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर खान यांनी वरील वक्तव्य केले आहे. काश्‍मीरबाबतचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT