monkeypox  esakal
ग्लोबल

Monkeypox : चिंता वाढली! ब्रिटनमध्ये आढळला मंकीपॉक्सचा नवा व्हेरियंट

सकाळ डिजिटल टीम

मंकीपॉक्सचा नवीन व्हेरिएंट सापडल्यानंतर यूकेमध्ये खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीमध्ये हा विषाणू आढळला आहे तो अलीकडेच पश्चिम आफ्रिकेत गेला होता. यूके हेल्थ सर्व्हिसेसने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जीनोम सिक्वेंसिंगमधून समोर आलेल्या माहितीनुसार यूकेमध्ये सध्या असलेल्या व्हेरिएंटपेक्षा हा स्ट्रेन वेगळा आहे. त्याचबरोबर ही व्यक्ती आतापर्यंत कोणाच्या संपर्कात आली आहे, याचीही माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान देशात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यासोबतच सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी इतर आवश्यक उपाययोजनाही केल्या जात आहेत. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या संचालिका सोफिया माकी म्हणाल्या, आम्ही पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना चेतावणी देत ​​आहोत. यासोबतच त्यांना असाही सल्ला देण्यात येत आहे की, त्यांच्यात मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास त्यांनी 111 वर कॉल करून माहिती द्यावी.

दरम्यान नवीन स्ट्रेन आढळलेल्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे, तर दुसरीकडे याशी संबंधित दुसरे प्रकरण समोर आलेले नाही ही दिलासादायक बाब आहे. त्याचबरोबर या आजाराची काही लक्षणे समोर आली आहेत, त्यातील काही इतकी गंभीर आहेत की, रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, गे आणि बायसेक्सुअल लोकांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT