haiti main.jpg 
ग्लोबल

मोठी बातमी! तुरुंगातून 400 कैदी पळाले, गोळीबारात 25 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

पोर्ट ऑ प्रिन्स (हैती)- हैतीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. कारागृहातून 400 हून अधिक कैदी फरार झाले आहेत. यावेळी झालेल्या गोळीबारात तुरुंग अधिक्षकासमवेत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी राजधानी पोर्ट ऑ प्रिन्सच्या ईशान्य दिशेला असलेल्या क्रुआ दि बुके सिव्हिल कारागृहात घडली. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी कारागृहात 1542 कैदी होते. 

हा तुरुंग 2012 मध्ये उभारण्यात आला होता. वर्ष 2014 मध्ये याच तुरुंगातून 300 हून अधिक कैदी फरार झाले होते. अर्नेल जोसेफ या गुन्हेगाराला तुरुंगातून नेण्यासाठी त्याच्या टोळीच्या लोकांनी हा प्रकार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बलात्कार, अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली 2019 मध्ये जोसेफला अटक करण्यात आली होती.

कारागृह अधिक्षकाचा गोळीबारात मृत्यू
तुरुंगातून फरार झाल्यानंतर तो मोटारसायकलवर जात होता. परंतु, पोलिसांच्या गोळीबारात त्याचा खात्मा झाला. 60 कैद्यांना पकडण्यात आले आहे. उर्वरित कैद्यांचा शोध घेतला जात आहे. कैदी कसे फरार झाले, याचा शोध घेण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेत कारागृह अधिक्षक पॉल जोसेफ हेक्टर यांचाही मृत्यू झाला आहे. 

स्थानिकांनी सांगितले की, कैदी फरार होण्यापूर्वी मोठ्या संख्येने शस्त्रास्त्र सज्ज लोकांनी तुरुंगातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. हा गोळीबार खूप वेळ सुरु होता. दरम्यान, हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवलेन मोइस यांनी शुक्रवारी टि्वट करुन या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असून लोकांना धैर्य राखण्याचे आवाहन केले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Ban For Children : १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करा; हायकोर्टाची केंद्र सरकारला सूचना

Morning Breakfast Recipe: एकाच प्रकारचे कटलेट बनवण्यापेक्षा असेही ट्राय करा, सर्वजण आवडीने खातील, नोट करा रेसिपी

आजचे राशिभविष्य - 26 डिसेंबर 2025

हिवाळा - आरोग्यदायी ऋतू

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT