Papua New Guineas Esakal
ग्लोबल

Papua New Guineas: पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन! संयुक्त राष्ट्रांने ढिगाऱ्याखाली 670 हून अधिक लोक दबल्याची भीती केली व्यक्त

Papua New Guineas: पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनाबाबत संयुक्त राष्ट्राकडून मोठे वक्तव्य आले आहे. भूस्खलनामुळे 670 हून अधिक लोक मातीखाली गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

संयुक्त राष्ट्र संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये सुमारे 670 लोक गाडले गेल्याचा अंदाज आहे.

पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनाबाबत संयुक्त राष्ट्राकडून मोठी माहिती समोर आली आहे. भूस्खलनामुळे 670 हून अधिक लोक मातीखाली गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या उत्तर-पश्चिमेला सुमारे 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतातील काओकलाम गावात पहाटे 3 वाजता (स्थानिक वेळेनुसार) भूस्खलन झाले.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे गाळाखाली दबलेल्या लोकांची संख्या 670 वर गेली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेचे प्रमुख सेरहन अक्टोप्राक यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या भूस्खलनामुळे 150 हून अधिक घरे गाडली गेली आहे. यांबाली गाव आणि एन्गा प्रांतातील अधिकाऱ्यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित मृतांची संख्या आहे.

अक्टोप्राक यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, 670 हून अधिक लोक मातीखाली गाडले गेल्याचा आमचा अंदाज आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरुवातीला शुक्रवारी मृतांची संख्या १०० किंवा त्याहून अधिक ठेवली. तर रविवारपर्यंत केवळ पाच मृतदेह आणि एका पीडितेचा एक पाय सापडला आहे.

भूस्खलनामुळे सुमारे 150 पेक्षा जास्त घरं ढिगाऱ्याखाली दबली आहेत. दक्षिण-पश्चिम पॅसिफिक महासागरात असणाऱ्या या देशातील एन्गा प्रांतात डोंगराळ प्रदेशात ही घटना घडली आहे.

अक्टोप्राक म्हणाले की, "जमीन अजूनही सरकत असल्याने" बचावकर्त्यांनासुद्धा धोका आहे. तसंच, ते पुढे म्हणाले की, पाणी वाहत आहे आणि यामुळे सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! सोनं खरेदीची सुवर्णसंधी? पाहा 24K, 22K आणि 18K चा ताजा भाव

Maharashtra CET Percentile Scam : महाराष्ट्रात CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा घोटाळा?; चौकशी होण्याची शक्यता

Latest Live Updates Marathi : : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस रस्त्यावरून थेट घरावर कोसळली; ३९ जण जखमी

Pimpri Rain: मुसळधार पावसाने पवना धरण ९६ टक्क्यांवर; आंद्रा शंभर टक्के भरले, पिंपरी परिसरात मुसळधार, तीन गावांचा संपर्क तुटला

Kalsubai Harishchandragad Sanctuary : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! भंडारदरा, कळसूबाई अन् हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्यांचा प्लॅन फसणार; 'या' कारणामुळे ट्रेकिंगवर बंदी

SCROLL FOR NEXT