Morocco Earthquake 
ग्लोबल

Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप! 296 हून अधिक ठार, शेकडो जखमी; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

रोहित कणसे

Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी मोजण्यात आली आहे. मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे किमान 296 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 153 लोक जखमी झाले आहेत.

मात्र या भूकंपातील मृतांची संख्या लक्षणीय वाढू शकते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराकेश शहरापासून 71 किमी दक्षिण-पश्चिमेस 18.5 किमी खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री 11.11 च्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान शहराबाहेरील जुन्या भागाचे झाले आहे. मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो देखील पोस्ट केली आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग पाहायला मिळत आहेत.

मराकेशमध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. सोशल मीडियावर अनेक पर्यटकांनी भूकंपानंतर लोक धावताना आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करतानाचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत.

PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखद क्षणांमध्ये माझ्या प्रार्थना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पोस्ट करण्यात आलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT