alexy nawalny. 
ग्लोबल

पुतिन यांनी घेतला बदला? अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांना कोर्टाने सुनावली कठोर शिक्षा

सकाळन्यूजनेटवर्क

मॉस्को- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक अ‍ॅलेक्सी  नवाल्नी यांच्याविरोधात कोर्टाने कठोर निर्णय घेतला आहे. रशियन कोर्टाने अ‍ॅलेक्सी  नवाल्नी यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर्मनीत असताना त्यांनी देशासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे. अ‍ॅलेक्सी  नवाल्नी यांच्यावर रशियात विषप्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. उपचारासाठी त्यांना जर्मनीत हलवण्यात आले होते. 

World Over Farmers Protest : ग्रेटा थनबर्ग-रिहानाचं समर्थन; तर कंगनाचा थयथयाट

रशियन अध्यक्षाचे कट्टर राजकीय विरोधक असलेले अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर पुतीन यांनीच विषप्रयोग केला असल्याचा आरोप केला जात होता. जर्मनीतील उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने 17 जानेवारीला नवाल्नी रशियात परतले. त्यावेळी त्यांना विमानतळावर अटक करण्यात आली. कोर्टात खटला चालल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, नवाल्नी यांनी याआधीच हॉऊस अरेस्टची शिक्षा भोगली असल्याने त्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे.  

अॅलेक्सी नवाल्नी यांची तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून रस्त्यावर उतरलेल्या त्यांच्या अनेक समर्थकांना पोलिसांनी अटक केली. विविध ठिकाणी होत असलेल्या निदर्शनांमध्ये हजारो समर्थक सहभागी होत आहेत. पोलिसांनी ही निदर्शने बेकायदेशीर ठरविली आहेत. तरिही पोलिसांना चकवीत समर्थक निदर्शने करीत आहेत. नवाल्नी यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी पुतीन यांच्या आलीशान किल्ल्याची पोलखोल केली होती. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र बनली आहे.

अर्थसंकल्पानंतर तुमच्या स्मार्टफोनचं बजेट बिघडणार; जाणून घ्या

नवाल्नी यांना मॉस्कोतील सोकोल्नीकी जिल्ह्यातील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथे जाण्याचा प्रयत्नही काही समर्थकांनी केला. नवाल्नी यांना संशयित विषबाधेमुळे जर्मनीत उपचार घ्यावे लागले. तेथून ते मायदेशी परतताच विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्यात आले. अपहारप्रकरणी पोलिसांसमोर नियमितपणे उपस्थिती नोंदविण्यात नवाल्नी अपयशी ठरले असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. आता नवाल्नी यांना शिक्षा झाल्याने त्यांचे समर्थन आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Marathi News Live Updates : माझी विनंती आहे कोर्ट आदेश डेसिबल पातळी पाळून गणेश उत्सव साजरा करावा - मेधा कुलकर्णी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

SCROLL FOR NEXT