massive explosion at a Jakarta mosque during Friday Namaj
esakal
Indonesia mosque blast injures 50 during Friday Namaj in Jakarta : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील केलापा गेडिंग परिसरातील एका मशिदीत शुक्रवारी दुपारी एक शक्तिशाली स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट सीनियर हायस्कूल 72 येथे शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला. या स्फोटात किमान १५ विद्यार्थी आणि पाच शिक्षक जखमी झाले. ही शाळा नौदलाच्या कंपाऊंडमध्ये असल्याने, नौदलाचे कर्मचारी आणि पोलिस तात्काळ पोहोचले. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा स्फोट झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, मशिदीच्या मुख्य हॉलच्या मागून मोठा आवाज आला आणि धूर पसरला. यामुळे नमाजींची पळापळ सुरू झाली. एका शिक्षकाने सांगितले की, "खुत्बा सुरूच झाला होता की अचानक मोठा स्फोट झाला. खोलीत धुराचे लोट पसरले. मुलं रडत आणि ओरडत बाहेर पळाली, काहीजण पडले. बहुतेक जखमींना काचेच्या तुकड्यांनी दुखापत झाली आणि स्फोटाच्या भयानक आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम झाला. यानंतर जखमींना तातडीने निकटच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटानंतर लगेचच नौदलाचे कर्मचारी आणि जकार्ता पोलिसांनी परिसराला वेढा घातला. बॉम्ब शोध पथकाने मशीद आणि आजूबाजूच्या परिसराची कसून तपासणी केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. कदाचित हा स्फोट शॉर्टसर्किट किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातील बिघाडामुळे देखील झाला असू शकतो.
मात्र, घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत, ज्यात घरगुती बॉम्बचे भाग, रिमोट कंट्रोल, एअरसॉफ्ट गन आणि रिव्हॉल्व्हर प्रकारचे शस्त्र यांचा समावेश आहे. तरी या घटनेचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक आणि बॉम्ब निकामी करणारे तज्ञ सर्व वस्तूंची तपासणी करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.