Elon Musk Twitter Deal esakal
ग्लोबल

Elon Musk : ब्लू टीकचा 'तो' निर्णय स्थगित; Twitter च्या मालकाचा यु-टर्न

ट्वीटरमध्ये सध्या मनमानी कारभार चालल्याची टीका इलॉन मस्क यांच्यावर केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

ब्लू टीकसाठी आता पैसे द्यावे लागणार असा निर्णय ट्वीटरने घेतला आणि त्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली. थोड्याच दिवसांत आता पुन्हा हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता इलॉन मस्क आणि ट्वीटरच्या मनमानी कारभारावरुन टीकेला सुरुवात झाली आहे. सध्या ब्लू टीक सेवेचं आठ डॉलर्सचं सबस्क्रिप्शन रद्द करण्यात आलं आहे.

ट्वीटरने ट्वीटर ब्लू असं नवं फिचर सेवेत आणलं होतं. या नुसार, ब्लू टीक घेण्यासाठी आठ डॉलर्स मोजावे लागणार असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्वीटरने ही सेवा तूर्तास स्थगित केली आहे. युजर्सकडून या ब्लू टीकचा गैरवापर केला जात असल्याचंही ट्वीटरने म्हटलं आहे. ज्यांनी आधी सबस्क्रिप्शन घेतलं, त्यांची सेवा सुरुच राहणार आहे.

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

काय आहे ही सेवा?

१. कोणत्याही पडताळणीशिवाय व्हेरिफाईड बॅज मिळणार

२. रिप्लाय, मेन्शन, सर्च या सेवांमध्ये सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजर्सना प्राधान्य मिळणार

३. स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होणार

४. मोठे ऑडिओ, व्हिडीओ पोस्ट करता येणार

५. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासून या युजर्सची सुटका होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT