myanmar army chief. 
ग्लोबल

अबोल सैनिक ते देशाचे लष्कर प्रमुख; म्यानमारची सत्ता हाती घेणारे मिन आहेत कोण?

सकाळन्यूजनेटवर्क

म्यानमार- सोमवारी म्यानमारच्या लष्कराने सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी (एनएलडी) च्या नेत्यांना ताब्यात घेऊत सत्तापालट केला आहे. त्यामुळे स्टेट काऊंसलर आँग सांग स्यू की यांच्याशिवाय आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. हे नाव आहे म्यानमार लष्कराचे प्रमुख जनरल मिन आंग लाईंग यांचे. लष्कराने देशात एक वर्षासाठी आणीबाणी लागू केली आहे. जाणून घेऊया म्यानमारची राजकीय स्थिती काय आहे आणि लष्कर प्रमुख कोण आहेत जे देश संभाळतील. 

म्यानमारमध्ये सैन्याचा दबदबा कायम राहिला आहे. 1962 मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर जवळपास 50 वर्ष सैन्याने प्रत्यक्षरित्या राज्य केलं आहे. 2008 मध्ये म्यानमारमध्ये जेव्हा संविधान तयार झाले, त्यावेळी लष्कराने आपली स्थायी भूमिका कायम केली होती. संसदेतील एकूण जागांपैकी 25 टक्के जागा लष्करासाठी राखीव ठेवण्यात आल्या. एवढेच नाही तर संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि सीमा प्रकरणातील मंत्र्यांच्या नियुक्तीचा अधिकार सैन्याला देण्यात आला. त्यामुळे लष्कराचं सत्तेवरील प्रभूत्व कायम राहिलं. 

लष्कर प्रमुख मिन आंग लाईंग

लष्कर प्रमुख मिन आंग लाईंग 64 वयाचे आहेत. लाईंग यांनी 1972-74 साली रंगून यूनिवर्सिटीमधून कायद्याचे शिक्षण घेतले. ते ज्यावेळी कायद्याचे शिक्षण घेत होते, त्याचवेळी देशात राजकीय सुधारणांसाठी लढाई सुरु होती. लाईंग यांना कमी बोलायला आवडायचं. त्यांनी 1974 मध्ये मिलिटरी यूनिवर्सिटी डिफेंस सर्विसेज अॅकेडमी (डीएसए) जॉईन केलं. ते एक साधारण विद्यार्थी होते, पण त्यांना हळूहळू प्रमोशन मिळत गेलं. 2011 मध्ये ते म्यानमार सैना प्रमुख बनले. 

लाईंग फेसबुकवर सक्रिय होते. प्रत्येक बैठकीचे किंवा भेटीचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करायचे. त्यांचे फेसबुकवर हजारो फॉलोवर्स होते, पण 2017 मध्ये रोहिंग्या मुस्लिमांवरील लष्कराच्या कारवाईमुळे त्यांचे पेज बंद करण्यात आले. 2016 मध्ये त्यांनी आपला कार्यकाळ 5 वर्षांनी वाढवून घेतला. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.  

अमेरिकेने लाईंगवर लावले निर्बंध

2017 मधील म्यानमार लष्कराच्या कारवाईमुळे 7 लाख 30 हजारांपेक्षा अधिक रोहिंग्या मुस्लिम देश सोडून बांगलादेशमध्ये पळून गेले. याकाळात अनेकांच्या हत्या, गँग रेप, अपहरण करण्यात आल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलं. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने 2019 मध्ये मिन आंग लाईंग यांच्यावर निर्बंध लादले होते. अनेक आंतरराष्ट्रीय कोर्टात त्यांच्याविरोधात खटले चालवण्यात आले. आयसीजेमध्ये त्यांच्याविरोधात आजही खटला सुरु आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT