Myanmar Government News Myanmar Government News
ग्लोबल

म्यानमारमध्ये ४ लोकशाही समर्थकांना फाशी; ५० वर्षांत प्रथमच

सकाळ डिजिटल टीम

बँकॉक : म्यानमार सरकारने (Myanmar Government) नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीचे (NLD) माजी खासदार, लोकशाही समर्थक कार्यकर्ते आणि इतर दोघांना फाशी (capital Punishment) दिली आहे. मागच्या वर्षी लष्कराने सत्ता काबीज केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. म्यानमारमध्ये पाच दशकांत पहिल्यांदाच एखाद्याला फाशी देण्यात आली आहे. ‘मिरर डेली’ या अधिकृत वृत्तपत्रात फाशीची माहिती दिलेली आहे.

दहशतवादी (Terrorist) कारवायाअंतर्गत हत्येच्या कृत्यांमध्ये सहकार्य केल्याबद्दल, हिंसाचार घडवून आणण्यासाठी आदेश दिल्याबद्दल चौघांना फाशीची शिक्षा (capital Punishment) सुनावली होती. मात्र, फाशी कधी दिली हे सांगितलेले नाही. लष्करी सरकारने या बातमीची पुष्टी करणारे संक्षिप्त निवेदन जारी केले. परंतु, ज्या तुरुंगात कैद्यांना ठेवले होते तेथील तुरुंग विभागाने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

‘राष्ट्रीय एकता सरकार’च्या मानवाधिकार मंत्री आंग म्यो मीन यांनी हे लोक हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप फेटाळला आहे. फाशी दिलेल्यांमध्ये फ्यो जेया थो यांचा समावेश होता. जो पदच्युत नेत्या आंग सान स्यू की यांच्या सरकारमधील माजी खासदार होते. ज्यांना मंग क्वान म्हणून ओळखले जाते. बॉम्बस्फोट आणि दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याच्या आरोपाखाली त्यांना जानेवारीमध्ये दोषी ठरवले होते. क्वान यांची पत्नी थाजिन न्युंट ओंग म्हणाली की, पतीच्या फाशीची माहिती दिली नव्हती. मी स्वतः याची पुष्टी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

क्वान यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. २००७ मध्ये जनरेशन वेव्ह राजकीय चळवळीचा सदस्य होण्यापूर्वी ते संगीतकार देखील होते. २००८ मध्ये माजी लष्करी सरकारच्या काळात परकीय चलन आणि अवैध संबंध ठेवल्याबद्दल त्यांना तुरुंगातही टाकले होते. क्वान व्यतिरिक्त ५३ वर्षीय लोकशाही समर्थक क्वाई मीन यू यांनाही दहशतवादविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल फाशी देण्यात आली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना अटक केली होती.

मार्च २०२१ मध्ये लष्कराचे गुप्तहेर असल्याच्या संशयावरून महिलेचा छळ करून खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या हला म्यो ओंग आणि ओंग थुरा जो यांनाही फाशी देण्यात आली. आशियातील ह्युमन राइट्स वॉचच्या कार्यवाहक संचालक एलेन पिअरसन यांनी सांगितले की, चौघांविरुद्धची कायदेशीर कारवाई अत्यंत अन्यायकारक आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित लष्करी कारवाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

SCROLL FOR NEXT