Naming of Turkey, Will be known as Turkiye Naming of Turkey, Will be known as Turkiye
ग्लोबल

तुर्कस्तानचे नामकरण : आता ओळखले जाणार ‘या’ नावाने; जाणून घ्या...

दिपाली सुसर

तुर्कस्तान प्रांताचे नाव बदलण्याची विनंती संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केली आहे. तुर्कस्तानचे (Turkey) नवीन नाव आता संयुक्त राष्ट्राच्या परवानगीने ‘तुर्किये’ असे करण्यात आले आहे. तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री मेव्हतुल कावुसोग्लू यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून तुर्कस्तानचे नाव बदलून (Naming) ‘तुर्किये’ करण्याची विनंती केली होती, असे यूएनचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले. (Naming of Turkey, Will be known as Turkiye)

पत्र मिळताच ठराव घेऊन नाव बदलण्यात (Naming) आले आहे, असेही स्टीफन दुजारिक यांनी सांगितले. मंगळवारी तुर्कस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना पत्र लिहून माहिती दिली. आमच्या दळणवळण संचालनालयासोबत मिळून आम्ही यासाठी एक चांगला पायंडा तयार केला आहे. नामकरणाविषयी तुर्कस्तानचे (Turkey) राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांनी डिसेंबरमध्ये देशवासीयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक गोष्टीत तुर्कस्तान नाव वापरण्यास सांगितले होते.

तुर्कस्तान (Turkey) प्रत्येक देशाला व भाषेला मानतो. त्यामुळे तुम्ही आमच्याही भाषेचा आदर करावा हिच अपेक्षा एर्दोगन यांनी सर्व कंपन्यांना केली होती. निर्यात केलेल्या प्रत्येक गोष्टीवर ‘मेड इन तुर्कस्तान’ लिहायचे. तुर्की लोक हे संस्कृती, सभ्यता आणि मूल्ये यांचे उत्तम जतन करतात.

या देशांनीही बदलले नाव

  • काही काळापूर्वी नेदरलँड्सने जगातील आपली प्रतिमा उंचवण्यासाठी हॉलंड हे नाव काढून टाकले आहे.

  • मॅसेडोनियानेही आपले नाव बदलून उत्तर मॅसेडोनिया केले.

  • पर्शियाने सुद्धा १९३५ मध्ये नाव बदलून इराण असे केले आहे. पर्शियन भाषेत इराण म्हणजे पर्शियन. पाश्चात्त्य देश याला पर्शिया म्हणत. पण नंतर स्थानिक भाषेच्या नावानेच देश ओळखला जावा असा समज जनमानसात रुजला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

SCROLL FOR NEXT