पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सध्या जी 20 शिखर परिषदेत (G20 Summit) सहभागी होण्यासाठी रोममध्ये आहेत. पाच दिवसांच्या या दौऱ्यात नरेंद्र मोदींनी काल पियाझा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला वंदन केलं. कोरोना महामारीच्या सावटानंतर पहिल्यांदाच जगातील मोठे नेते एकत्र आले असून, नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आले असून, त्यावरून आता लोक नरेंद्र मोदींना मास्क बद्दल प्रश्न विचारताना दिसताय. नरेंद्र मोदींनी यावेळी मॅक्रॉन यांची गळाभेट घेतल्याचं देखील दिसून आलं आहे. या फोटोत त्यांनी मास्क न घातल्याचं दिसून येतंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांची गळाभेट घेत त्यांच्याशी बोलत पूढे गेले. मॅक्रॉन हे सतत मास्कचा वापर करत असून, आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्वांनी मास्क लावल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नेटकऱ्यांनी मोदींना आपला मास्क कुठे आहे असा प्रश्न विचारला आहे.
प्रभाकर मुंद्रा यांनी या फोटोवर "मास्क नसलेले एकमेव!" अशी प्रतिक्रीया दिली. तर अतूल यादव यांनी आपला मास्क कुठे आहे असं विचारलं.
नमीत देसाई यांनी ट्विट करत लिहीलं की, आपली व्हक्सीन सगळ्यात चांगली आहे, मास्क वास्क आपण नाही वापरत.
दरम्यान, या फोटोमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देखील आपला मास्क खाली करून पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना दिसता आहेत. मात्र नरेंद्र मोदींकडे मास्कच नसल्याने त्यांच्यावर टीका होतेय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.