ग्लोबल

NASA: आज नासा 'Artemis I' करणार लाँच; पहिल्या प्रयत्नात आला होता अडथळा

तांत्रिक अडथळा आल्यामुळे या रॉकेटचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आले होते

सकाळ डिजिटल टीम

नासा आज पुन्हा एकदा नव्या मोहिमेच्या तयारीत आहे. आज (शनिवारी) नासाकडून नवीन चंद्रयान लाँच करण्यात येणार आहे. 'आर्टेमिस आय' असं नासाच्या या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे. नासाकडून आज शक्तिशाली चंद्रयान लाँच केले जाणार आहे. फ्लोरिडातील कॅनिडी स्पेस सेंटर येथून आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी Artemis I हे रॉकेट लाँच करण्यात येणार आहे.

Artemis I हे रॉकेट याआधीच लाँच करण्यात येणार होते. परंतु, यामध्ये तांत्रिक अडथळा आल्यामुळे या रॉकेटचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आले होते. Artemis I या रॉकेटमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरु होतं. आज दुसऱ्यांदा हे रॉकेट लाँच करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नासाकडून यासाठीची तयारी सुरु केली आहे. यावेळी हे रॉकेट लाँच यशस्वी होईल अशी आशा नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही चाचणी करण्यात येत आहे. या चंद्रयानामधून एकही वैज्ञानिक चंद्रावर जाणार नाही. तर या रॉकेटमध्ये ओरियन कॅप्सूल असणार आहे. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जाणार आहेत. यावेळी नासा स्पेससूट आणि रेडिएशन लेवलेचे मूल्यांकन करणार आहे. पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जात आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल. ओरियन चंद्राभोवती 42 दिवसांचा प्रवास करेल.

याआधी 29 ऑगस्टला या चंद्रयानचे प्रक्षेपण करण्यात येणार होतं. लाँचची सर्व तयारीही करण्यात आली होती, परंतु प्रक्षेपण होण्यापूर्वीच त्याच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने प्रक्षेपण थांबवण्यात आलं होतं. इंजिन सेन्सरमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने चंद्रयानाचं प्रक्षेपण थांबवावं लागलं, असं त्यावेळी नासाकडून सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

Latest Marathi News Update : आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Pimpri: विनापरवाना उभारली तीनमजली इमारत; मोशीतील बांधकामाबाबत अनेक प्रश्न, जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT