नवीन शेखरप्पा नवीन शेखरप्पा
ग्लोबल

खार्किवमध्ये नवीनचा मृत्यू : युक्रेन, रशियाच्या राजदूतांना समन्स

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. यात आता भारतीयांचा देखील समावेश झाला आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा (Naveen ShekharAppas) (वय २१, रा. कर्नाटक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. भारत सरकारने (Indian government) याप्रकरणी युक्रेन आणि रशियाच्या राजदूतांना समन्स बजावले आहेत.

परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना बोलावत आहेत. जे भारतीय नागरिक अजूनही खार्किव आणि इतर संघर्ष क्षेत्रांमधील शहरांमध्ये आहेत त्यांच्यासाठी तात्काळ सुरक्षित प्रवास करण्याच्या आमच्या मागणीचा पुनरुच्चार करीत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये अशीच कारवाई आमच्या राजदूतांद्वारे केली जात आहे, असे ट्विट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले.

आम्ही अत्यंत दुःखाने पुष्टी करतो की खार्किवमध्ये आज सकाळी झालेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मंत्रालय मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे, असे ट्विट बागची यांनी नवीनबद्दल केले. खार्किवमधील (Kharkiv) बिघडलेली परिस्थिती चिंतेचे कारण आहे. खार्किवमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत राहू, असे परराष्ट्र मंत्रालयाने (Indian government) म्हटले आहे.

गरजेला त्वरित प्रतिसाद देणे अत्यावश्यक

आम्ही रशियन आणि युक्रेनच्या दूतावासांसोबत खार्किव (Kharkiv) आणि संघर्षग्रस्त भागातील इतर शहरांमधून विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित मार्गाची गरज आधीच मांडली आहे. ९,००० हून अधिक भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले आहे. लक्षणीय संख्या आता सुरक्षित भागात आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनने (Ukraine) आमच्या सुरक्षित मार्गाच्या गरजेला त्वरित प्रतिसाद देणे अत्यावश्यक आहे, असे मंत्रालयाने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT