Nepal Plane Crash esakal
ग्लोबल

नेपाळ लष्करानं शोधलं दुर्घटनेचं ठिकाण; चक्काचूर झालेल्या विमानाचा PHOTO आला समोर

सकाळ डिजिटल टीम

'तारा एअरलाइन्स'चं विमान रविवारी नेपाळमध्ये कोसळलं.

'तारा एअरलाइन्स'चं ट्विन इंजिन '9 NAET' विमान रविवारी नेपाळमध्ये (Nepal Plane Crash) कोसळलं. नेपाळ लष्करानं (Nepal Army) सोमवारी विमान जिथं कोसळलं, त्या ठिकाणाचा शोध घेतलाय. विमान अपघाताची माहिती गोळा करण्यासाठी लष्करानं सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केलीय. कारण, रविवारी बर्फवृष्टीमुळं शोध मोहीम थांबवण्यात आली होती. नेपाळ लष्करानं ही माहिती दिलीय.

लष्करानं सांगितलं की, बचाव पथकानं अपघातस्थळाचा शोध घेतलाय. लष्करानं मुस्तांगमध्ये कोसळलेल्या विमानाचं ठिकाण थसांग-2 च्या सॅनोसवेअरचं छायाचित्रही शेअर केलंय. नेपाळचे पोलीस निरीक्षक राज कुमार तमांग यांच्या नेतृत्वाखालील पथक विमानानं अपघातस्थळी पोहोचलं आहे. लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, 'काही प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवणं कठीण आहे, तरीही मोहीम सुरूच आहे. नेपाळच्या लष्कराला मुस्तांग जिल्ह्यात ‘तारा एअर’ या विमान कंपनीच्या (Tara Air Airlines) दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषाबद्दल सुगावा मिळालाय.'

विमानात 22 जण होते

ब्रिगेडियर नारायण सिल्वाल (Brigadier Narayan Silval) म्हणाले, 'सैनिक आणि बचाव कर्मचार्‍यांनी अपघातस्थळाचा शोध घेतलाय. मुस्तांग जिल्ह्यातील थसांग-2 चे सनोसवेअर हे अपघाताचं ठिकाण आहे. तारा एअरलाइनच्या ट्विन ऑटर 9N-एईटी विमानानं रविवारी सकाळी 10 वाजता पोखरा येथून उड्डाण केलं, परंतु 15 मिनिटांनंतर नियंत्रण टॉवरशी संपर्क तुटला. यात चार भारतीय, दोन जर्मन आणि 13 नेपाळी नागरिकांसह एकूण 22 जण विमानात होते. त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT