Ramdev baba Google file photo
ग्लोबल

नेपाळमध्ये ‘पतंजली’ चॅनेल्सवरून वाद; नेपाळ सरकार म्हणतं...

सकाळ डिजिटल टीम

काठमांडू : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली ग्रुपच्या मालकीच्या दोन वाहिन्या नेपाळमध्ये सुरु झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या वादावर आज नेपाळ सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. या वाहिन्यांसाठी पतंजली ग्रुपने नेपाळमध्ये कोठेही पायाभूत बांधकाम केले नसल्याचे सरकारने सांगितले आहे. गेल्या आठवड्यात रामदेव बाबांच्या उपस्थितीत पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी आस्था नेपाळ टीव्ही आणि पतंजली नेपाळ टीव्ही या वाहिन्यांचे उद्घाटन केले होते. नेपाळच्या माध्यमक्षेत्रात परकी गुंतवणूकीला परवानगी नसल्याने या वाहिन्या सुरु करण्यावरून वाद झाला होता. मात्र, वाहिन्यांचे उद्घाटन झाले असले तरी त्या सुरु झाल्यानसून अधिकृत परवानगी मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाईल, असे पतंजली ग्रुप आणि नेपाळ सरकारने स्पष्ट केले. आस्था नेपाल टीव्ही आणि पतंजली नेपाल टीव्ही असं या दोन चॅनेल्सची नावे आहेत.

मीडिया क्षेत्रात गुंतवणुकीला परवानगी नाही

नेपाळच्या कायद्यानुसार, मीडिया क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीसाठी परवानगी नाहीये. त्यामुळे या दोन्ही चॅनेल्सच्या लाँचिंग नंतर वाद निर्माण झाला. हा वाद सुरु झाल्यानंतर नेपाळच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत आपला तपास सुरु केला. गुरुवारी विभागाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. या विभागाचे डायरेक्टर गोगन बहादुर हमाल यांनी म्हटलंय की, तपासाअंती असं आढळलंय की, पतंजली समूहाने वास्तवात टीव्ही चॅनेल्स लाँच केलेलेच नाहीयेत तसेच आमच्या विभागाकडून त्याबाबत कसलीही अधिकृत परवानगी दिली गेली आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की, पंतजली समूहाने केवळ सांकेतिक पद्धतीने या चॅनेल्सची सुरुवात केली होती.

पुढे त्यांनी म्हटलंय की, पतंजली समूहाने चॅनेल्स चालवण्यासाठी कसल्याही प्रकारची उपकरणे आणलेली नाहीयेत. जर एखाद्या समूहाने याप्रकारे एखादे उपकरण आणले असते आणि त्याचे संचालन सुरु केले असते तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई केली असती. त्यांनी म्हटलंय की, नेपाळचा कायदा मीडिया क्षेत्रामध्ये कसल्याही प्रकारच्या परदेशी गुंतवणुकीस परवानगी देत नाही. जर एखादा समूह टेलीव्हीजन चॅनेलची सुरुवात करु इच्छित असेल तर त्यासाठी गुंतवणुकदार नेपाळीच असला पाहिजे तसेच कंपनी योग्य पद्धतीने नोंदणीकृत असली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंचा दावा तथ्यहीन, कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबत प्रशासनाचं स्पष्टीकरण; बावनकुळेंकडे सोपवला अहवाल

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्ग आता थेट रेडी बंदर अन् मुंबई-गोवा हायवेला जोडणार! MSRDC चे पुन्हा सर्व्हेचे आदेश, आमदार केसरकरांनी दिली मोठी अपडेट

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींचे रांचीमध्ये आंदोलन; विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो विधानसभेच्या घेराव मोर्चात सहभागी

Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? तुकाराम मुंढेंनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव; किस्सा ऐकून सगळेच हसले

MS Dhoni Pension : सहा वर्षांपूर्वी निवृत्ती, IPL मध्ये अजूनही खेळतोय महेंद्रसिंग धोनी! भारताच्या माजी कर्णधाराला पेन्शन किती?

SCROLL FOR NEXT