ISI Sakal
ग्लोबल

ISI एजंटची पळून पळून केली हत्या; वाचवण्यासाठी मुलीची छतावरून उडी

सकाळ डिजिटल टीम

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयएसआय एजंटची पळून पळून हत्या करण्यात आली आहे. लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी असं या ISI एजंटचं नाव असून तो कारने आपल्या घरी आला होता. घरी आल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याला वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीने छतावरून उडी मारली पण गोळीबारात मोहम्मद दर्जी याचा मृत्यू झाला आहे.

(ISI Agent Murder in Nepal)

दरम्यान, हत्या करण्यात आलेला मोहम्मद दर्जी हा पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून भारतीय चलन भारतात पोहचवत होता. ISIच्या सांगण्यावरून तो हे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर तो डी गँगच्या संपर्कात होता. त काठमांडू येथील कोठाटार येथे राहत होता. १९ सप्टेंबर रोजी तो आपल्या कारने घरी आला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. ते पाहून त्यांच्या मुलीने छतावरून उडी टाकली आणि हल्लेखोरांकडे पळाली पण त्या हल्ल्यात मोहम्मदचा मृत्यू झाला. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ४ जुलै २००७ रोजी काठमांडू मधील एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्येच्या आरोपाखाली लाल मोहम्मद आणि डी कंपनीचा शार्प शूटर मुन्ना खान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्या दोघांना दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर लाल मोहम्मद याची आता अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे.

काय आहे ISI?

इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) ही आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांत या संस्थेचा हात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Winter Fashion: हिवाळ्यात 'कम्फर्ट' आणि 'स्टायलिश' राहायचंय? मग स्मिता शेवाळेच्या खास टिप्स फॉलो करा!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

SCROLL FOR NEXT