Kulman Ghising’s name emerges as a strong contender for Nepal’s interim Prime Minister amid political changes.
esakal
Nepal Interim Prime Minister latest updates : नेपाळमधील हिंसाचाराच्या दरम्यान आता अंतरिम सरकार स्थापनेच्या तयारीला जोरदार हालचाली सुरू आहेत. खरंतर पंतप्रधान पदासाठी अनेक दावेदारांची नावं समोर येत आहेत. माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्यानंतर आता कुलमन घीसिंग यांचे नाव नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी समोर आले आहे. तरूणांच्या समर्थनानंतर आता कुलमान घीसिंग यांचे अंतरिम पंतप्रधान बनणने जवळपास निश्चित मानले जात आहे.
तर या शर्यतीत आधी सर्वात आघाडीवर असणाऱ्या सुशील कार्की यांचे नाव आज मागे पडल्याचे दिसले. आंदोलक तरुणांकडून कुलमन यांचे नाव अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे आता भारतात शिक्षण घेतलेले कुलमन हे नेपाळच्या अंतरिम सरकारचे प्रमुख होण्याची चिन्हं आहेत.
स्थानिक रिपोर्टनुसार, आंदोलक तरूणांनी गुरुवारी नेपाळ विद्यूत प्राधिकरणाचे माजी प्रमुख कुलमन घीसिंग यांचे नाव देशाच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी पुढे केले आहे. तर सुशीला कार्की यांचे नाव कालपर्यंत या पदासाठी जवळपास निश्चित मानले जात होते, त्यानंतर रात्रीतून घडामोडी घडल्या आणि त्यांचे नाव मागे पडले. एवढंच नाहीतर जेन-झेड नेपाळच्या नावे जारी झालेल्या एका विधानात नमूद केले गेले आहे की, काही कारणास्तव कार्की यांच्या नावावर विचार केला जाऊ शकत नाही.
नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदासाठी सर्वात पुढे ज्यांचे नाव आहे, ते ५४ वर्षीय कुलमन घीसिंग नेपाळच्या विद्यूत बोर्डाचे माजी प्रमुख आहेत. घीसिंग यांनी काठमांडू घाटीत प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या वीज कपातीच्या समस्येवर तोडगा काढत, ही समस्या संपवली होती. यासाठी त्यांची भरपूर प्रशंसा झाली होती. खरंतर, नेपाळ सरकारने मार्चमध्ये कुलमन यांना त्यांच्या पदावरून काढले होते. कुलमन यांच्या बडतर्फी मागे त्यांचे उर्जामंत्री दीपक खडका यांच्याशी असणारे मतभेद होते.
कुलमन यांच्या सरकारविरोधी भूमिकेमुळे त्यांना तरुणांमध्ये ओळख मिळाली होती. अशात आता प्रचंड विरोध प्रदर्शनादरम्यान आंदोलक तरूणांनी कुलमन यांचेच नाव अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून पुढे केले आहे. विशेष म्हणजे कुलमन यांचे भारतासोबत विशेष नातंही आहे, भारतामधूनच त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. कुलमन यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण भारतात जमशेदपूर येथे घेतले. यानंतर ते वर्ष १९९४मध्ये एनइएमध्ये रुजू झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.