new consent condom wont open unless two people unpack it 
ग्लोबल

कंडोमचे पाकीट उघडायला लागणार दोघांचे हात! (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

ब्यूएनोस (अर्जेंटिना): येथील ट्युलीपॅन अर्जेंटिना नावाच्या कंपनीने नवीन कंडोम बाजारात आणला असून, त्याचे पाकीट उघडायला दोघांचे हात लागणार आहे. चार हात असल्याशिवाय हे पाकीट उघडले जाणार नाही, असे कंपनीने जाहिरातीमध्ये म्हटले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'कंडोमच्या पाकिटाच्या चारही कोनांवर समान दाब दिल्यानंतरच ते उघडेल. शरीरसंबंध ठेवण्यासाठी दोघांची परवाणगी असेल तरच या कंडोमचा वापर करता येईल, या उद्देशाने अशाप्रकारेच पॅकेजिंग करण्यात आले आहे. थोडक्यात, दोघांची संमती असेल तरच हे पाकीट उघडू शकेल. पण, 'जर होकार नसेल तर नकारच' अशी या कंडोमच्या जाहिरातीची टॅगलाइन आहे. या वर्षाअखेरीसपर्यंत हा कंडोम बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या कंपनी या कंडोमची चाचणी करण्यासाठी अनेक ठिकाणी या कंडोमचे मोफत वाटप केले जात आहे.'

‘ट्युलीपॅन ही कंपनी नेहमीच सुरक्षित शरीरसंबंध ठेवण्यासंदर्भात जनजागृती करत आहे. मात्र, यावेळी शरीरसंबंध ठेवताना सर्वात महत्वाची गोष्टच जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन आमच्यासमोर आहे. जर दोघांचा होकार असेल तरच शरीरीसंबंधांचा आनंद घेता येतो.' असे मत या कंडोमच्या जाहिरातीची जबाबादारी असलेल्या बीबीडीओ कंपनीच्या जॉक्वीन कॅम्पीन्स यांनी न्यू यॉर्क पोस्टशी बोलताना व्यक्त केली आहे.

#MeToo या मोहिमेनंतर हा कंडोम तयार करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे समजते. या मोहिमेमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. त्यामुळेच होकार असेल तरच शरीरसंबंध ठेवता येण्यासंदर्भात कंपनीने केलेला हा एक प्रयत्न आहे. सोशल मिडियावरही या कंडोमची चांगलीच चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT