mount everest 
ग्लोबल

माऊंट एव्हरेस्टची उंची वाढली की कमी झाली?; नेपाळने केलं जाहीर

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 2015 मध्ये झालेल्या भयंकर भूकंपानंतर हिमालय भागातील पर्वतरागांच्या भूभागामध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यानंतर जगातील सर्वांत उंच समजल्या जाणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट Mount Everest पर्वतशिखराची उंची कमी झाल्याचं बोललं जातं होतं. त्यानंतर नव्याने माऊंट एव्हरेस्टची उंची नेपाळकडून मोजण्यात आली आहे. माऊंट एव्हरेस्टची उंची 8848.86 मीटर असल्याचे नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीर केलं आहे. एनआयएने यासंबंधातील वृत्त दिलं आहे. 

2015 मध्ये आलेल्या भूकंपानंतर जवळपास एक वर्षाच्या आकडेवारीच्या आधारे, Mount Everestची नवी उंची मंगळवारी जाहीर करण्यात आली. सर्व्हे ऑफ इंडियानं 1954 नं काढलेल्या आकडेवारीनुसार (Mount Everest) ची उंची 8848 मीटर इतकी होती. 1975 मध्ये चीनने या पर्वताची उंची  8848.13 मीटर इतकी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नव्याने जाहीर केल्यानुसार माहितीनुसार माऊंट एव्हरेस्टची उंची वाढल्याचं दिसतंय. 2.8 फूटांनी शिखराची उंची वाढली आहे. हे पर्वतीय टोक सागरमाथा या नेपाळी नावानंही ओळखलं जातं. 

जगातील सर्वांत उंच शिखराची उंची आणखी वाढली आहे. चीन आणि नेपाळने संयुक्तपणे माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848.86 मीटर असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे माऊंट एव्हरेस्टची उंची 2.8 फूटाने वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे चीन आणि नेपाळने पहिल्यांदाच संयुक्तपणे या उंचीवर एकमत नोंदवले आहे. यापूर्वी उभय देशांनी माऊंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत वेगवेगळे दावे केले होते. 2015 मध्ये झालेल्या भूकंपामुळे माऊंट एव्हरेस्टची उंची कमी झाल्याच्या तज्ज्ञांच्या दावाही यामुळे फोल ठरला आहे. 

चीन विरुद्ध नेपाळ

जगातील सर्वात उंच पर्वताची उंची मोजणे सोप्पं काम नसते. चीन आणि नेपाळ यांच्यात माऊंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत कधीही एकवाक्यता नव्हती. दरम्यान, माऊंट एव्हरेस्ट चीन आणि नेपाळच्या सीमेवर आहे. या भागात अनेक उंच शिखरे आहेत. ज्यांची उंची 8 हजार मीटरच्या पुढे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT