Abdulrazak Gurnah
Abdulrazak Gurnah esakal
ग्लोबल

जेव्हा नोबेल ॲकॅडमीचा Call आला, तेव्हा कादंबरीकार गुर्नाह स्वयंपाक करत होते!

बाळकृष्ण मधाळे

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या टांझानियन कादंबरीकार अब्दुलराजाक गुर्नाह यांच्यासाठी 'गुरुवार' हा एक सामान्य दिवस होता.

लंडन : साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या टांझानियन कादंबरीकार अब्दुलराजाक गुर्नाह (Abdulrazak Gurnah) यांच्यासाठी 'गुरुवार' हा एक सामान्य दिवस होता. या दिवशी कादंबरीकार गुर्नाह त्यांच्या स्वयंपाकघरात बहुधा स्वयंपाक करत होते आणि अचानक एक फोन आला आणि फोनवरील व्यक्ती त्यांच्याशी बोलू लागली. 2021 साठी 'नोबेल साहित्यिक पुरस्कार' (Nobel Literature Prize 2021) मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन! गुर्नाह, त्यांच्या सामान्य रूटीनमध्ये व्यस्त होते. त्यांना कोणीतरी आपली थट्टा करतंय, असा भास झाला. नंतर त्या व्यक्तीनं गुर्नाह यांना सांगितलं, खरंच आपल्याला नोबेल पुरस्कार प्राप्त झालाय, तेव्हा त्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि 'धन्यवाद' असं बोलून फोन कट केला. पण, मिळलेल्या सर्वात मोठ्या पुरस्कारानं त्यांच्यात कुठेच अविर्भाव दिसला नाही, हीच एका सामान्य साहित्यिकाची खासियत म्हणावी लागेल.

टांझानियन कादंबरीकार अब्दुलराजाक गुर्नाह यांना 2021 मधील साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झालेय. 1986 नंतर गुर्नाह हे पहिले आफ्रिकन कृष्णवर्णीय आहेत, ज्यांना साहित्यासाठी नोबल पारितोषिक देण्यात आला. 1948 साली झांझीबारमध्ये जन्मलेल गुर्नाह 1960 च्या उत्तरार्धात ते शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये आले. गुर्नाह हे 73 वर्षांचे आहेत. नुकतीचे निवृत्त होईपर्यंत ते केंट, कॅंटरबरी विद्यापीठात इंग्रजी आणि उत्तर-औपनिवेशिक साहित्याचे प्राध्यापक होते. ते पॅराडाइज आणि डेझर्टेशन या प्रसिद्ध कांदबऱ्यांसह 10 कादंबऱ्यांचे लेखक आहेत.

1994 मध्ये प्रकाशित झालेल्या पॅराडाईजने 20 व्या शतकाच्या सुरुवातीला टांझानियामध्ये वाढलेल्या एका मुलाची कहाणी सांगितली आणि कादंबरीकार म्हणून गुर्नाह यांनी नावलौकिक मिळवून बुकर पारितोषिक जिंकले. 1986 मध्ये वोले सोयन्कानंतर साहित्यामधील नोबेले पुरस्कार जिंकणारे गुर्नाह हे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन लेखक आहेत. गेल्या वर्षीचा पुरस्कार अमेरिकन कवी लुईस ग्लुक यांनी जिंकला होता. स्वीडिश अॅकॅडमीने म्हटलंय, की, तडजोडीशिवाय आणि सहानुभूतीशिवाय औपनिवेशिकचे परिणाम समजून घेण्याकरिता त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान केला जात आहे. 1993 नंतर गुर्नाह हा पुरस्कार जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय आफ्रिकन लेखक आहे. टोनी मॉरिसननं 1993 मध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं. स्वीडन अकादमीनं त्यांना पुरस्काराची माहिती देण्यासाठी फोन केला, तेव्हा गुर्नाह दक्षिण पूर्व ब्रिटनमधील त्यांच्या घरात स्वयंपाक करत होते. सुरुवातीला त्यांना हा फोन कॉल हास्यास्पद वाटला. तद्नंतर खरं कारण समजल्यावर ते खूप खूश झाले.

करुणेनं हिंसेचा सामना करा

कादंबरीकार गुर्नाह म्हणाले, विस्थापन आणि स्थलांतराचे विषय मी माझ्या लेखात मांडलेत आणि या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय. 1960 मध्ये मी ब्रिटनमध्ये आलो आणि आज इथली स्थिती खूपच वेगळी आहे. स्थलांतरानं जगभरात अनेक लोक मरताहेत, जखमी होत आहेत. आपण या समस्यांना अत्यंत करुणेनं सामोरे गेलं पाहिजे, असं ते सांगतात.

गुर्नाह यांनी लिहिल्या 10 कादंबऱ्या

गुर्नाह यांची 'पॅराडाइज' कादंबरी 1994 मध्ये बुकर पुरस्कारासाठी निवडली गेली होती. त्यांनी एकूण 10 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. नोबेल कमिटी ऑफ लिटरेचरचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी त्यांचं वर्णन, गुर्नाह हे औपनिवेशिक काळातील जगातील सर्वात प्रतिष्ठित लेखकांपैकी एक आहेत, असं संबोधलं आहे. या पुरस्काराचं स्वरुप सुवर्णपदकसह 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (अंदाजे $ 11.4 दशलक्ष) असं आहे.

नोबेल शांतता पुरस्काराची 10 डिसेंबरला घोषणा

गेल्या वर्षी साहित्यातील नोबेल पुरस्कार अमेरिकन कवी लुइस ग्लुक यांना देण्यात आला होता. नोबेल समितीनं सोमवारी वैद्यकशास्त्रासाठी, मंगळवारी भौतिकशास्त्रासाठी आणि बुधवारी रसायनशास्त्रासाठी विजेत्यांची घोषणा केलीय. शांती आणि इतर नोबेल पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबरला दिला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT