Nokia Sakal
ग्लोबल

नोकियाने दिली तीन दिवस घरून काम करण्याची परवानगी

घरून काम करण्याचे धोरण गेल्या डिसेंबरमध्ये बंद करण्यात आले, पण जानेवारीपासून कामाच्या तासात सोईनुसार बदल करण्यास मुभा देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

स्टॉकहोम (स्वीडन) - नोकिया कंपनीने (Nokia Company) कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस घरून काम (Work from Home) करण्याची परवानगी (Permission) दिली आहे. तसा पर्याय खुला करण्यात आला. (Nokia Gave Permission to Work from Home for Three Days)

घरून काम करण्याचे धोरण गेल्या डिसेंबरमध्ये बंद करण्यात आले, पण जानेवारीपासून कामाच्या तासात सोईनुसार बदल करण्यास मुभा देण्यात आली. या निर्णय सर्वेक्षणातून घेण्यात आला. त्यावेळी बहुतांश कर्मचाऱ्यांनी दोन ते तीन दिवस घरून काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

कार्यालयात फेरबदल

नोकियाची कार्यालयांच्या इमारतीत फेरबदल करण्याचीही योजना आहे. काही ठिकाणी ७० टक्के जागा सांघिक उपक्रम आणि बैठकांसाठी देण्यात येईल, तेथे कामासाठी आरक्षित जागा कमी असेल. डलास, सिंगापूर, बुडापेस्ट येथील कार्यालयांमध्ये यापूर्वीच फेरबदल करण्यात आले आहेत. इतर ठिकाणी यंदाच्या वर्षाच्या अखेरीस पूरक बदल केले जातील. रेनॉ आणि स्टेलॅंटीस या मोटारउत्पादक कंपनीने तीन दिवस घरून कामाबाबत कर्मचाऱ्यांशी करार केले आहेत.

कर्मचारी कपातही करणार

नोकियाचे १३० देशांत सुमारे ९२ हजार कर्मचारी आहेत. येत्या दोन वर्षांत दहा हजार कर्मचारी कमी करण्याची योजना आहे. खर्च कमी करून संशोधन क्षमता वाढविण्यासाठी जास्त गुंतवणूक करण्याचे धोरण असल्याचे यंदा मार्च महिन्यात सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT