North Korea Ballistic Missile Japan esakal
ग्लोबल

North Korea : किम जोंग उनच्या देशानं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र; जपान नागरिकांत घबराट

टोकियोवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर जपाननं आज आपल्या रहिवाशांना आश्रयस्थान सोडण्याचं आवाहन केलं.

सकाळ डिजिटल टीम

टोकियोवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर जपाननं आज आपल्या रहिवाशांना आश्रयस्थान सोडण्याचं आवाहन केलं.

सियोल : उत्तर कोरियानं (North Korea) आज (मंगळवार) पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (Ballistic Missile) चाचणी घेतली. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं आपल्या पूर्व किनारपट्टीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागलं आहे.

उत्तर कोरियानं टोकियोवर (Tokyo) बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर जपाननं आज आपल्या रहिवाशांना आश्रयस्थान सोडण्याचं आवाहन केलं. क्योडो न्यूजनुसार, सरकारनं मंगळवारी पहाटे एक इशारा जारी करून जपानच्या उत्तरेकडील मुख्य बेट, होक्काइडो आणि ईशान्य प्रांत आओमोरी येथील रहिवाशांना घरात राहण्याचं आवाहन केलंय. क्षेपणास्त्र डागल्याच्या वृत्तानंतर जपान सरकारनंही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलंय. किम जोंग उनच्या (Kim Jong Un) देशानं एका आठवड्यात ही पाचवी क्षेपणास्त्र चाचणी केलीय.

अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्यात संयुक्त सराव

अमेरिका (America) आणि दक्षिण कोरियाच्या (South Korea) लष्करी सरावानंतर उत्तर कोरियानं एका आठवड्यात इतक्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग-उन यांनी याआधीच दोन्ही देशांना सराव न करण्याचा इशारा दिला होता. हा लष्करी सराव अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात झाला. नौदल दलांसह हा त्रिपक्षीय पाणबुडीविरोधी सराव होता. दरम्यान, जेव्हा-जेव्हा उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचणी घेतं, तेव्हा जपान आणि दक्षिण कोरियासाठी चिंतेचा विषय बनलेला असतो. यातील बहुतांश क्षेपणास्त्रं जपानच्या समुद्राला लक्ष्य करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT