Kim Jong Un North Korea esakal
ग्लोबल

दक्षिण कोरिया Kim Jong Un च्या पुन्हा रडारवर; उत्तर कोरियानं डागली 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं

उत्तर कोरियाकडून त्यांच्या सागरी क्षेत्राजवळ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर कोरियाकडून त्यांच्या सागरी क्षेत्राजवळ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत.

उत्तर कोरियानं (North Korea) पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी (Ballistic Missile Testing) घेतलीय. याआधी उत्तर कोरियानं तीन क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचा दावा केला जात होता. मात्र, नंतर ही संख्या 10 झाली आहे.

उत्तर कोरियाच्या या कारवाईनं दक्षिण कोरिया ढवळून निघालंय. दक्षिण कोरियात (South Korea) उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या मोठ्या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. क्षेपणास्त्र चाचणीच्या काही तास आधी दक्षिण कोरियासोबत लष्करी सराव वाढवल्याबद्दल अमेरिकेवर (America) टीका झाली होती.

दक्षिण कोरियाच्या लष्करानंही (South Korea Army) या संदर्भात दावा केलाय की, उत्तर कोरियाकडून त्यांच्या सागरी क्षेत्राजवळ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफनं (Joint Chiefs of Staff) म्हटलंय, 'उत्तर कोरियाच्या वोंसल शहराजवळून सकाळी 8.51 च्या सुमारास क्षेपणास्त्र डागण्यात आलं आहे.'

उत्तर कोरियानं डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या सागरी सीमेपासून 26 किमी अंतरावर पडल्याचं दक्षिण कोरियाचं म्हणणं आहे. हा परिसर दक्षिण कोरियाच्या उलेंग बेटापासून 167 किमी अंतरावर आहे. उत्तर कोरियाकडून केल्या जाणाऱ्या अशा आक्रमक कारवायांना दक्षिण कोरिया विरोध करत आहे. उत्तर कोरियाशी सामना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अमेरिकेसोबत काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT