vaccine 
ग्लोबल

लस टोचल्यानंतर आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू; नॉर्वेमध्ये खळबळ

सकाळ डिजिटल टीम

नॉर्वे - जगातील अनेक देशांमध्य़े कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये काही लशींना आपत्कालीन वापरसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतातही 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लशीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नॉर्वेत फायजरची व्हॅक्सिन टोचल्यानंतर 23 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.

नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 13 वृद्धांवर व्हॅक्सिनचे दुष्परिणाम झाले ते गंभीर स्वरुपाचे होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. नॉर्वेच्या इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थने सांगितलं की,'दुर्धर आजार असलेल्या लोकांवर लशीचे गंभीर परिणाम होऊ शकतात.'

नॉर्वेने आतापर्यंत 33 हजार लोकांना व्हॅक्सिन दिलं आहे. देशात त्या लोकांकडे लक्ष दिलं जात आहे ज्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे. यापैकी बहुतांश लोकांना बायोएनटेक, फायजर व्हॅक्सिन देण्यात आली आहे. याशिवाय मॉडर्नाची व्हॅक्सिनही दिली आहे. 

दोन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी सध्या नॉर्वेमध्ये सुरु आहे. या दोघांनाही फायजर आणि बायोएनटेकची लस देण्यात आली होती. नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीचे मेडिकल डायरेक्टर स्टीनर मॅडसन यांनी सांगितलं की, आम्हाला याची माहिती घ्यावी लागेल की व्हॅक्सिनमुळे त्यांचा मृत्यू झाला की हा फक्त योगायोग आहे. 

मॅडसन असेही म्हणाले की, वृद्धांना कोरोना व्हॅक्सिन देण्यात आले होते आणि त्यांचा मृत्यू हा एक योगायोगही असू शकतो. याआधी फायजर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी म्हटलं होतं की, व्हॅक्सिन घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग रोखता येईल की नाही हे सांगता येणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे जिल्हा परिषदेचे २५ विद्यार्थी नासा दौऱ्यावर; स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल कॅम्पसलाही देणार भेट

Jatayu Earth's Centre: रावणाशी लढलेल्या जटायूचं भव्य शिल्प! PM मोदींच्या संभाव्य भेटीमुळे चर्चेत आलेलं हे ठिकाण कुठे आहे? जाणून घ्या कसं पोहोचाल

Latest Marathi News Live Update : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपात वादंग

२ डिसेंबरपासून पाच राशींचे अच्छे दिन! बुधाचं राशीपरिवर्तन देणार नोकरीसह व्यवसायातही फायदा, अडकलेले पैसेही मिळणार

Asaduddin Owaisi: 'तुम्ही भाजपवर टीका का करत नाहीत?', प्रश्नावर ओवैसी संतापले; अखिलेश यादवांना थेट चर्चेचे आव्हान

SCROLL FOR NEXT