ग्लोबल

'भारत-रशिया संबंधांमध्ये बदल व्हावेत, अशी इच्छा नाही, मात्र...'; अमेरिकेचं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत आणि रशिया हे दोन्ही मित्र देश म्हणून ओळखले जातात. या दोन्ही देशांमधील संबंध ऐतिहासिक असून दोघांनीही वेळोवेळी आपल्या मैत्रीला जागत नातेसंबंध जपले आहेत. मात्र, सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकलेलं असून प्रत्येक देशाला या युद्धासंदर्भात काहीतरी एक ठोस भूमिका घेणं क्रमप्राप्त ठरलं आहे. या युद्धासंदर्भात काही एक ठोस भूमिका घेणं भारताला मात्र अवघड जात असल्याचं चित्र आहे. युद्ध कोणत्याही समस्येवरचं उत्तर असू शकत नाही, त्यामुळे संवादानेच प्रश्न सोडवले जावेत, अशीच भारताची आतापर्यंतची भूमिका राहिली आहे. (India-Russia)

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्या भारत दौऱ्यावर अमेरिकेकडून एक मोठं वक्तव्य करण्यात आलंय. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी म्हटलंय की, अमेरिकेला भारत-रशिया या देशांच्या दरम्यान असलेल्या संबंधांमध्ये कसल्याही प्रकारच्या बदलांची अपेक्षा नाीह. मात्र, सर्वच देशांनी रशियाबाबतच्या त्या बाबीकडे लक्ष दिलंच पाहिजे, ज्या एकसुरात बोलल्या जात आहेत. (India-Russia)

कुणाच्याही संबंधात आडकाठी बनणार नाही

नेड प्राईस यांनी म्हटलंय की, वेगवेगळ्या देशांसोबत रशियाचे आपले संबंध आहेत आणि हे वास्तव आहे. हे एक भौगोलिक सत्य आहेत. असं काहीही नाहीये की जे आम्ही बदलू इच्छितो. आम्ही जे करु इच्छितो ते भारताच्या संबंधी असो वा जगातील इतर सहकाऱ्यांच्या संदर्भात असो. अनुचित, पूर्व नियोजित आक्रमकतेच्या विरोधात बोलणं आणि हिंसेला समाप्त करणे हेच आमचं उद्देश आहे. (India-Russia)

तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अमेरिका भारताला त्याच्या गोटात ओढण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकेचा हाच उद्देश आहे की, रशिया आणि भारताची ही जवळीकता कमी व्हावी. जर हे देश आणखी जवळ येत गेले तर त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावर होईल. खासकरुन संरक्षण क्षेत्रातील व्यापारावर त्याचा परिणाम होईल. या युद्धाच्या निमित्ताने दोन्ही देशांमधील अंतर जास्तीतजास्त कसे वाढेल, याचाच प्रयत्न अमेरिका करत असून भारताचा रशियाच्या बाजूने असलेली ओढ कमी व्हावी. (India-Russia)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT