Islamic State Khorasan Pakistan esakal
ग्लोबल

प्रेषित मोहम्मद-नुपूर शर्मा वाद चिघळला; अल-कायदापाठोपाठ IS ची थेट भारताला धमकी

सकाळ डिजिटल टीम

अल-कायदापाठोपाठ आता इस्लामिक स्टेटनंही प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादात उडी घेतलीय.

अल-कायदापाठोपाठ (Al-Qaeda) आता इस्लामिक स्टेटनंही प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावरील वादात उडी घेतलीय. इस्लामिक स्टेट खोरासान (Islamic State Khorasan Pakistan) प्रांतानं भारतात हल्ल्याची धमकी दिल्याचं वृत्त आहे. अलीकडंच अल-कायदानं (AQIS) भारतात हल्ल्याची धमकी दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, भाजपनं कारवाई करत शर्मा यांना पक्षातून निलंबित केलंय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ISKP नं त्यांचं मुखपत्र अल अजैम फाऊंडेशनद्वारे (Al Azim Foundation) न्यूज बुलेटिन सेवा सुरू केलीय. पहिल्या न्यूज बुलेटिनमध्ये संघटनेनं 'भारत आणि ईशनिंदा' या विषयावर विशेष चर्चा केल्याचं वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, खोरासान डायरीच्या स्वतंत्र न्यूज हँडलच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, व्हिडिओमध्ये नूपुर शर्मा आणि बुलडोझरच्या कारवाईचा उल्लेख करण्यात आलाय.

तालिबानलाही केलं लक्ष्य

खोरासान डायरीनुसार, व्हिडिओमध्ये तालिबानवर भारतासोबत मुत्सद्दीपणे संबंध ठेवल्याबद्दल टीका करण्यात आलीय. यामध्ये मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब यानं एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यामुळं त्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याकुब हे काळजीवाहू संरक्षण मंत्री आहेत.

अल-कायदानं काय म्हटलं?

प्रेषित मोहम्मद यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली होती. न्यूज एजन्सी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार धमकीच्या पत्रात अल-कायदानं म्हटलं होतं की, 'आम्ही आमच्या पैगंबरांचा अपमान करणार्‍यांना मारून टाकू. आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटकं बांधून आम्ही त्या लोकांना उडवून देऊ, अशी धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT